• Home
  • मौजे जाहूर येथे 64 वा धम्मचक्रप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला.

मौजे जाहूर येथे 64 वा धम्मचक्रप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला.

मौजे जाहूर येथे 64 वा धम्मचक्रप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला.

मुखेड तालुक्यांमध्ये मौजे जाहूर येथील बुद्ध विहारांमध्ये दिनांक 20 ऑक्टोंबर 2020 रोजी 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन covid-19 कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री जे.बी.कांबळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहन चा कार्यक्रम करण्यात आले.तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बौद्ध समाज बांधवांच्या वतीने बुद्धवंदना घेण्यात आली.यावेळी गावातील असंख्य बौद्ध उपासक व उपासिका हजर होते.अनेक गावातील तरुण बांधव हजर होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध धर्मांचा एक खास सण म्हणून ओळखला जातो.हा दिवस धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.कारण याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.त्यामुळे बौद्ध अनुयायी दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात धम्मचक्रप्रवर्तन दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.मात्र दरवर्षी उत्साहात साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन कोरोना-या संसर्ग रोगामुळे एकदम साधेपणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुखेड येथील पंचायत समिती चे सदस्य श्री जे.बी कांबळे सर ,प्राध्यापक पि.के गायकवाड सर, डॉक्टर गवलवाड सर ,डॉक्टर राहुल कांबळे सर, रोहित दादा पवार विचार मंचाचे तालुका सचिव श्री मनोहर नागराळे साहेब ,प्रकाश हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे आयोजन हानमत वाघमारे , शिवाजी घाटे,बालाजी गायकवाड आदींनी आयोजन केले होते.

anews Banner

Leave A Comment