Home गडचिरोली केन्द्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा:-इंजि. प्रमोदजी पिपरे

केन्द्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा:-इंजि. प्रमोदजी पिपरे

113

आशाताई बच्छाव

IMG_20231229_074603.jpg

केन्द्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा:-इंजि. प्रमोदजी पिपरे

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत गडचिरोली विसापूर येथे भव्य महिला शिबीर,व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

गडचिरोली,(सुरज गुंडमवार):-

राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविले जात आहे.देशाचे प्रधानमंत्री,श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेत्रुत्वातील भारत सरकारने महिलांना लोकसभा,विधानसभेत प्रतीनीधित्व देणारा निर्णय,मुस्लिम महिलांना त्रिपल तलाक पासुन सुटका देणारा निर्णय,सैनीक शाळेत मुलीना प्रवेश,10 करोड गरीब महिलांना मोफत.गँस,घरकुल,शौचालय, किसान सन्मान योजनेचा लाभ,24 कोटी गरीब महिलांचे मोफत जनधन बँक खाते,असे अनेक महिलांच्या विकासा करीता निर्णय घेउन भारतातील मात्रुशक्तींचा सन्मान केला आहे.या सर्व कल्याणकारी योजनेचा शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोकसभा समनव्ययक इंजि.प्रमोदजी पिपरे यांनी केले.

नगरपरिषद गडचिरोली यांच्या वतीने विसापूर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत भव्य महिला शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उद्घाटक स्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांतजी वाघरे,भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव मा.रमेशजी भूरसे,भाजपा जिल्हा महामंत्री मा.प्रकाश गेडाम,शिवसेना महिला संपर्कप्रमुख मा.हर्षाताई मोरे,नप मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर,नप उपमुख्याधिकारी रविंद्र भांडारवर,माजी उपनगराध्यक्ष मा.नक्टुजी पेटकर,भाजपा तालुका अध्यक्ष मा.विलास पाटील भांडेकर,मा.लताताई पुंगाटे,माजी नप सभापती केशवजी निंबोड,मा.शामजी वाडई,माजी नगरसेवक अविनाश वरघंटिवार,मा.सौ.मुनघाटे ताई,मा.डॉ.गेडामताई तसेच मोठया संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध योजनांचे स्टॉल लावलेले होते.१४१२ महिला उपस्थित होत्या,सदर महिलांना विविध योजना अंतर्गत 5758 लाभांचे वितरण करण्यात आले.यावेळी रांगोळी स्पर्धा,समूह नृत्य,संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेतील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
संचालन संध्या चिलमवार तर आभार गणेश ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नगरपरिषदेतील अधिकारी,कर्मचारी तसेच नपशाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Previous articleमाळेगाव यात्रा येथील लोकमान्य टिळक गणेश मंडळ एक गाव एक गणपती मंडळातर्फे जि.प .केंद्रीय शाळेला सांऊड सिस्टीम भेट
Next articleतेली समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता :- इंजि. प्रमोदजी पिपरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.