Home गडचिरोली तेली समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता :- इंजि. प्रमोदजी पिपरे

तेली समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता :- इंजि. प्रमोदजी पिपरे

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20231229_074941.jpg

तेली समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता :- इंजि. प्रमोदजी पिपरे

वैरागड येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व तेली समाज मेळाव्याचे आयोज

गडचिरोली,(सुरज गुंडमवार):- 

तेली समाज हा महाराष्ट्रात प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक,राजकीय तसेच सर्वांगीण विकासासाठी तेली समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांनी केले.
तेली समाज वैरागड च्या वतीने संत जगनाडे महाराज पुण्यतिथी व तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोदजी पिपरे बोलत होते.
या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासंघाचे उपाध्यक्ष श्री.बबनराव फंड यांनी केले.यावेळी श्री. किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे,प्रभाकर वासेकर,बाबुरावजी कोहळे,माजी प्राचार्य पी.आर.आकरे,उमेशचंद्र चीलबुले,तुळशीराम चिलबुले,विस्तार अधिकारी जवनजाळकर, परसराम टिकले,मिलिंद खोब्रागडे,फाल्गुन मेहेरे,दत्तात्रय क्षीरसागर,सरपंच संगीता पेंदाम,आत्माराम भानारकर,माजी सरपंच लीलाताई मुंडले,बुद्धाजी किरणे,पुंडलिक देशमुख,रामदास जंजाळकर,शेषराव पिंपळे,संगीता मेश्राम,मनीषा खरवडे,महादेव दुमाने,सुभाष बरडे,रामदास डोंगरवार,सत्यदास आत्राम,दिलीप फुलबांधे,विजय गुरनुले,गोपाल भांडेकर,डोनूजी कांबळे,प्रलय सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक उपसरपंच भास्कर बोडने यांनी केले तर यशस्वीतेसाठी रमेश लांजेवार,संदीप ठेंगरे,सुखदेव बोडणे,सुरेश बावनकर,रमेश ओक,अमोल लांजेवार,पांडुरंग आकरे,चंदू बावनकर,वंदना बोडणे,रंजना ठेंगरे,दुर्गा बोधनकर,संगीता आकरे,ज्योती मेहरे,अलका बावनकर,लता आकरे,पूजा लांजेवार,उषा क्षीरसागर,शुभांगी बावनकर व समाज बांधवांनी सहकार्य केले.
कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.तत्पुर्वी सकाळी गावाच्या मुख्य रस्त्याने श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

Previous articleकेन्द्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा:-इंजि. प्रमोदजी पिपरे
Next articleदेगलूर महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठाच्या संघात निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here