Home नांदेड कोरोना ओमायकाॅन संसर्गमुक्तीच्या प्रार्थनेसाठी अजमेरला सायकल ने प्रवास

कोरोना ओमायकाॅन संसर्गमुक्तीच्या प्रार्थनेसाठी अजमेरला सायकल ने प्रवास

170
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना ओमायकाॅन संसर्गमुक्तीच्या प्रार्थनेसाठी अजमेरला सायकल ने प्रवास
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
कोरोना मुक्त विश्र्व व्हावे विश्वात शांतता नांदावी सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे कोरोना ओमायक्रोन विषाणू जनजागृती संदेश घेऊन सायकल वरून मुखेड ते अजमेर शरीफ राजस्थान प्रवाशांची सुरुवात दि12 जानेवारी रोजी पहाटे होणार आहेत असल्याची माहिती शहरातील शिवाजीनगर येथील इरफान सौदागर उर्फ हुसेनसाब इब्राहिम निचलकर यांनी दिली दोन वर्षापासून कोरोना वायरस ने संपूर्ण जगात हहंकार माजवला आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन कडक निर्बंध लावण्यात आले यामुळे कष्टकरी कामगार गोरगरिबांची उपासमार झाली अनेकांना आर्थिक आर्थिक संकटाचा सामना करावा लागला उद्योग व्यापार ठप्प झाल्याने बेरोजगारी वाढली परत नवीन ओमायक्रोन विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे निर्बंध लावण्यात येत आहेत म्हणून विश्वा कोरोना मुक्त व्हावे विश्वास शांतता नांदावी सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे बेरोजगारांना रोजगार मिळावे सह कोरोना वायरस संबंधी जनजागृतीसाठी मुखेड ते अजमेर सायकल वारी करून जगप्रसिद्ध सुफीसंत हजरत खाजा मईनोदीन चिश्ती र अ दर्गाह अजमेर येथे प्रार्थना करणार असल्याची माहिती सायकल प्रवासी इरफान सौदागर उर्फ हुसेनसाब इब्राहिम निचलकर यांनी दिली इरफान यांचा सायकल प्रवास सुकर व्हावा यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here