Home नांदेड देगलूर महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठाच्या संघात निवड.

देगलूर महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठाच्या संघात निवड.

55
0

आशाताई बच्छाव

IMG_20231229_075325.jpg

देगलूर महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठाच्या संघात निवड.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलुर येथील देगलुर महाविद्यालयातील एम.ए.द्वितीय वर्षाचा विद्यार्थी हिरेवाड बालाजी व बी.ए.प्रथम वर्षाची विद्यार्थिनी गुडूप शिवरानी या खेळाडूंची नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या

अॅथलेटिक्स संघात निवड झाली आहे. येत्या २६ ते २९ डिसेंबर या कालावधीत ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथील कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी येथे आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या
खेळाडूंचा विद्यापीठ संघात निवड झाली आहे. या दोन्ही खेळाडूंचे प्रशिक्षक प्रा. डॉ.निरज उपलंचवार हे असून तर प्रा.दिपक वावधाने व प्रा हाके सिताराम यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,देगलुर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानी यांनी आभिनंदन केले आहे.

Previous articleतेली समाजाने एकत्रित येण्याची आवश्यकता :- इंजि. प्रमोदजी पिपरे
Next articleदेगलूर येथे सकल मराठा समाजातर्फे शिवसेना नेते माजी मंत्री तथा आमदार रविंद्र वायकर यांचा ताफा आडवला.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here