Home रत्नागिरी रत्नागिरीतील बारसू गावात रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

रत्नागिरीतील बारसू गावात रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0061.jpg

पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: रत्नागिरीतील बारसू गावात रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध पहायला मिळाला. पूर्वी हा प्रकल्प रत्नागिरीतील नानार या गावी होणार होता, परंतु तेथील ग्रामस्थांनी याला विरोध करून हा प्रकल्प बंद पाडण्यास यशस्वी झाले.तेथील ग्रामस्थांनी हा प्रकल्प होऊ दिला नाही. नंतर हा प्रकल्प पुन्हा रत्नागिरी मध्ये बारसू गावात होणार असे जाहीर होतात तेथील ग्रामस्थ यांनी या रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे .तेथील बहुसंख्य हजारो महिलांनी या रिफायनरी प्रकल्प विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले व रस्त्यावर उतरले. रत्नागिरी मध्ये बारसू गावात या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले सरकारी अधिकारी व त्यांच्याबरोबर निलेश राणे हे होते. त्यांच्या सर्व गाड्यांचा ताफा महिला आंदोलकांनी रस्त्यावरच काही काळ अडवला . आपल्या मागण्या सविस्तर निलेश राणे व त्यांच्या अधिकारासमोर मांडले. त्यांनी स्पष्टपणे हा प्रकल्प होण्यासाठी नकार दिला, आणि रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका तेथील ग्रामस्थ व प्रचंड प्रमाणात असलेल्या महिलांनी घेतली .निलेश राणे यांनी सांगितले की तुमचा विरोध हा सरकारपर्यंत पोहोचला आहे असे समजा आणि तुमच्याबरोबर चर्चेसाठी आम्ही सदैव तयार आहोत असेही त्यांनी सांगितले. तुम्ही वार व तारीख सांगा आम्ही त्या दिवशी तुमच्याबरोबर याच्या विषयी चर्चा करण्यासाठी तयार आहोत .चर्चेतून काहीतरी मार्ग काढू असे निलेश राणे यांनी ग्रामस्थांना सांगितले. हा प्रकल्प होऊ देणार नाही त्याचबरोबर काल पोलिसांनी महिलांना केलेली धक्काबुक्की ही आम्ही सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवाई ही व्हायला पाहिजे असेही या ग्रामस्थांनी या ठिकाणी नमूद केले . महिलांनी या आंदोलनामध्ये सरकार विरोधात या रिफायनरी प्रकल्प विरोधात खूप जोरदार घोषणाबाजी केली आणि हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी तटस्थ भूमिका घेतली .हे सर्व पाहता त्यांच्याबरोबर आलेले सरकारी अधिकारी व निलेश राणे यांना सर्वेक्षण करण्याआधीच माघारी परतावे लागले.

Previous articleसमर्थांचे देव गेलेत चोरीला!
Next articleशेलापुर येथील कंत्राटदारlला अंगणवाडीच्या बालकाचा बळी हवा का? भ्रष्टाचारl तुन प्रचंड माया पुंजी जमा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here