Home अमरावती बोगस कपाशी बियाणावर’कृषी’ची धाड, गुजरात कनेक्शन उघड; ३.६७ लाखाची ४४२ पॅकेट जप्त.

बोगस कपाशी बियाणावर’कृषी’ची धाड, गुजरात कनेक्शन उघड; ३.६७ लाखाची ४४२ पॅकेट जप्त.

59
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230618-215757_WhatsApp.jpg

बोगस कपाशी बियाणावर’कृषी’ची धाड, गुजरात कनेक्शन उघड; ३.६७ लाखाची ४४२ पॅकेट जप्त.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी. एन. देशमुख.

ब्युरो चीफ रिपोर्टर

अमरावती

 

अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी.
अमरावती.
पेरणीच्या तोंडावर कपाशीच्या बोगस बियाण्याच्या अमरावती जिल्ह्यात शिरका झाल्याचे दिसून येते. कृषी विभागने शनिवारी उशिरा डमी ग्राहक बनून याचा भांडाफोड केला. त्यामध्ये ३.६७ लाख किमतीचे बोगस एच टी बी टी चे४४२ पाकिटे जप्त करण्यात आली
याप्रकरणी गाडगे नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. प्राथमिक चौकशी त गुजरात मधून मालआणल्याचे समोर आले आहे. दहा दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील प्रतिबंधित एच टीबीटीची५० पाकीट जप्त करण्यात आले तोच प्रकार १७ जूनला पुन्हा कृषी विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली. अशोक भाटे (३७रा. देशमुख लांनजवळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भाटे हा शनिवारी सायंकाळी सुरुची इन बार जवळ येणार असल्याची माहिती कृषी विभागाला मिळताच एस ए ओ राहुल सातपुते, ए डी ओ गोपाळराव देशमुख यांच्यासह पथकातील अधिकारी व गुन्ह्या शाखेचे पथकाने सापडा रचुन व आरोपी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चार चाकी ती पाहणी केली असता मागच्या सीटवर व डीपीमध्ये तसेच त्याच्या शिक्षक कॉलनीतील घरातून कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्याची ४४२ पाकीट जप्त करण्यात आली. यासोबतच वाहन आदी८,७७,१०४ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, जिल्हा गुणवंत नियंत्रण निरीक्षक दादासो पवार, पवन कुमार ढोमणे कृषी अधिकारी उद्धव भायेकर यांच्यासह पीएसआय राजकिरण येवले, पोहे का जावेद अहमद, योगेश पवार, गजानन ढेवले सहभागी होते या प्रकरणी उद्धव भायेकर यांनी गाडगे नगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असता, आरोपी अशोक गुलाबराव भाटे यांच्या विरुद्ध पोलिसांनी भादवीचे कलम४२० बियाणे नियम ९६८, नियम ७व८ बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ खंड ३,९ बियाणे अधिनियम १९६६ कलम ७(सी) पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम १५, महाराष्ट्र कापूस बियाणे १००९ कलम १२(९) अन्वये गुन्हा ही नोंद केला गेली आहे.

Previous articleकु.महेश्वरी प्रशांत बनबरे MHCET मध्ये 96.21 % गुण मिळवून घवघवीत यश मिळविले
Next articleपेढीधरणग्रस्ताच्या मागणीसाठी अमरावतीचे आमदार रवी राणांची थेट सचिवाल्यात धडक; उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here