Home अमरावती पेढीधरणग्रस्ताच्या मागणीसाठी अमरावतीचे आमदार रवी राणांची थेट सचिवाल्यात धडक; उपमुख्यमंत्री यांची भेट...

पेढीधरणग्रस्ताच्या मागणीसाठी अमरावतीचे आमदार रवी राणांची थेट सचिवाल्यात धडक; उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार.

78
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230618-220208_WhatsApp.jpg

पेढीधरणग्रस्ताच्या मागणीसाठी अमरावतीचे आमदार रवी राणांची थेट सचिवाल्यात धडक; उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार.
दैनिक युवा मराठा
वृत्त संकलन.
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
वलगाव परिसरातील अनेक गावांना फटका बसविणाऱ्या निम्न पिढी प्रकल्पग्रस्ताच्या प्रलंबित मागण्याबाबत बडनेरा चे आमदार रवी राणा यांनी थेट राज्याचे सचिवालय गाठून जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांची भेट घेतली. यावेळी अनेक मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान येत्या २१ जून रोजी पुन्हा या विषयावर एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. चिखलदरा तालुक्यातील प्रस्तावित मोठा सिंचन प्रकल्प, धारणी तालुक्यातील रखडलेला गडगा प्रकल्प, टेंभा पिढी ब्यारीज व जिल्ह्यातील इतर प्रकल्प यावर सुद्धा बैठकीत चर्चा झाली. रखडलेले पुनर्वसन, सिंचनाची सोय, प्रकल्पाचे कालवे, नव्या धोरणानुसार मोबदला, बाधित प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला नोकरी आधी विषयावर या बैठकीस सकारात्मक चर्चा झाली. दरम्यान येत्या बुधवारी २१ जून रोजीया विषयावर पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतर हा मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अंतिम बैठक घेऊन निकाली काढला जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी या विषयावर सरकारचे लक्ष घेतले होते. निम्न येडी प्रकल्पग्रस्तांना नवीन भूसंपादन कायदा २०१३ नुसार ८.२६ लाख रुपयाचे पॅकेज लागू करून सदर रक्कम एक मुक्त देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याचवेळी पुनर्वशी गावठाणातील रस्ते व उघडी गटारे याची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी १० कोटीच्या निधीची तरतूद करावी, असे सुद्धा त्यांचे म्हणणे होते. अंतर्गत खडीच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, खुल्या भूखंडाचे सौंदर्यकरण व योग्य प्रक्रियेच्या अंतर्गत पुनर्वसन आधी मागण्यासाठी त्यांनी सरकारचे लक्ष केंद्रित केले होते. निम्मपेडी प्रकल्पाचे खालील बाजूस असणाऱ्या मौजे निंबा व गणोजा देवी येथील ८० कुटुंबाचे पुनर्वसन करणे, वासेवाडी, सावरखेड, ततरपुर, नारायणपूर, रोहन खेड या गावाचे पुनर्वसन करणे आदी बाबींच्या पूर्ततेच्या मुद्दाही यावेळी चर्चेला घेतला गेला. धोरणात्मक निर्णय घेण्याच्या आग्रह यांनी धरला. पुनर्वसित गावठाणा स्वातंत्र्य महसुली दर्जा मिळावा, गावठाणा संविधान भवन, वाचनालय, खुल्या व्यायाम शाळा, सरपंच भवन, १०० कुटुंब मागे एक समाज मंदिर, भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती करता जागा आधी विकासात्मक कामासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची आग्रह भूमिका आमदार रवी राणा या बैठकी त यांनी मांडली.

Previous articleबोगस कपाशी बियाणावर’कृषी’ची धाड, गुजरात कनेक्शन उघड; ३.६७ लाखाची ४४२ पॅकेट जप्त.
Next articleअकोला- शहरातील अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची मालिका सुरूच
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here