Home जालना भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी  इंजि. श्रीपाद रत्नपारखी तर कार्याध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र...

भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी  इंजि. श्रीपाद रत्नपारखी तर कार्याध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र देशपांडे

16
0

आशाताई बच्छाव

IMG_20240218_075359.jpg

भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी  इंजि. श्रीपाद रत्नपारखी तर कार्याध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र देशपांडे
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे 
भगवान परशुराम जन्मोत्सव समिती 2024 च्या अध्यक्षपदी इंजि. श्रीपाद  त्र्यंबकराव रत्नपारखी यांची तर कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. नरेंद्र देशपांडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान भगवान परशुराम  जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे  नियोजन करण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी  जूना जालना वटवृक्ष संस्थान प्राचीन जालना येथे समस्त ब्राह्मण समाजाची बैठक पार पडली.
यावेळी सर्वानुमते परशुराम जन्मोत्सव समिती गठीत करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे. अध्यक्ष  – इंजि. श्रीपाद रत्नपारखी, कार्याध्यक्ष  अ‍ॅड. नरेंद्र देशपांडे, उपाध्यक्ष  दिलीप दाणी . या बैठकीचे प्रास्ताविक  अमोल मोहरीर यांनी केले. यावर्षी जन्मोत्सव निमित्त  विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरले.तर उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीपाद रत्नपारखी यांनी सांगितले. यावेळी विनायक महाराज फुलंब्रीकर, प्रकाश आचार्य, दिलीप देशपांडे, सुरेश मुळे प्रदीप मोहरीर, डॉ. संजय रुईखेडकर, शिवाजी जोशी, किरण मुळे, महेश वझरकर, पवन देशमुख, गणेश देशपांडे, विश्वंभर कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, संतोष दाणी, संदीप देशपांडे आदिंची उपस्थिती होती. बैठकीचे सुत्रसंचलन अ‍ॅड. सुबोध किनगावकर यांनी केले व उपस्थितांचे आभार अ‍ॅड.विनोद कुलकर्णी यांनी मानले.

Previous articleगुरू रविदास परिवर्तन व्याख्यानमाला समिती जाहिर
Next articleपंचायत समिती कृषी विभागामार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here