Home पुणे पंचायत समिती कृषी विभागामार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन

पंचायत समिती कृषी विभागामार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन

75
0

आशाताई बच्छाव

IMG_20240218_075650.jpg

दैनिक युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे

पंचायत समिती कृषी विभागामार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन

बेलसर दि.17: – शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन वाढ व उत्पादन खर्चामध्ये बचत याकरिता पुणे जिल्हा परिषद कृषी विभाग व पंचायत समिती पुरंदर कृषी विभाग मार्फत बेलसर(ता.पुरंदर) येथील विठ्ठल मंदिरात मंगळवार (दि.20)रोजी, तसेच वाल्हे (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायत सभागृहांमध्ये बुधवार (दि.21) रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील बांबू लागवडीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विविध पावले उचलली आहेत.बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यापासून ते बांबू निर्मित विविध वस्तूंना बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न अधिक गतीने करावे व जे शेतकरी बांबू लागवड करू शकतात त्यांना प्रोत्साहन द्यावे. बांबू लागवडीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमार्फत शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच रेशीम उत्पादन सुद्धा शेती व्यवसायामध्ये अधिक फायदेशीर आहे.

जिल्हा परिषद पुणे कृषी विभाग, मनरेगा योजना, राज्य शासन कृषी विभाग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन बांबू तज्ञ रणजीत गुळवे, जिल्हा रेशीम अधिकारी पुणेचे संजय फुले, कृषी अधिकारी पंचायत समिती पुरंदर विजय खेडकर या तज्ञांचे व अधिकारी यांचे याप्रसंगी मार्गदर्शन होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here