Home नांदेड भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण सन्माननिय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80व्या...

भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण सन्माननिय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मुखेड येथे वृक्षारोपण संपन्न.

138
0

राजेंद्र पाटील राऊत

भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण सन्माननिय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 80व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मुखेड येथे वृक्षारोपण संपन्न.

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
आज दिनांक 12/ 12/ 2020 रोजी मुखेड येथे जिल्हा परिषद हायस्कूल मुलांचे मुखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव व जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोकशेठ मुक्कावार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागनाथ जी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद हायस्कूल मुलांचे मुखेड जिल्हा नांदेड येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीभटक्या विमुक्त जाती जमाती सेल नांदेड जिल्हाअध्यक्ष अमोल वाकोडे यांनी माननीय शरद पवार साहेब यांनी आजवर केलेल्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक सहकार व इतर सर्वसामान्य जनतेकरिता व बहुजन समाजासाठी केलेल्या कामांचा आढावा मांडला तर माननीय पवार साहेबांच्या राजकीय किंवा देशाच्या राजकारणातले योगदान लक्षात घेतल्याशिवाय वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. असे प्रतिपादन महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष अर्जुन रॅपनवाड यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सचिव अशोक सावकार बच्चेवार हे होते,सूत्रसंचालन वसंत पाटील काठेवाड यांनी तर आभार प्रदर्शन संदीप तोटरे चांडो ळकर यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती संभाजी पाटील खांडेकर,पत्रकार संजय पिलेवाड,अहमद पठाण सर ,प्रकाश पाटील लुटे गणेश पाटील होकर्णकर, धनाजी धामणगावकर, संभाजी पाटील मरवाळीकर यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुक्यातील व शहरातील , विमुक्त जाती भटक्या जमातीतील व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.तर यावेळी बाळ गोपाळानी ही स्वयंस्फूर्तीने वृक्षारोपनात सहभाग घेतला.

Previous articleदेगलूर तालुक्यातील मरखेल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाला
Next articleपीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे सोमवारी धरणे आंदोलन- कैलास येसगे कावळगावकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here