Home नांदेड पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे सोमवारी धरणे आंदोलन- कैलास येसगे कावळगावकर

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे सोमवारी धरणे आंदोलन- कैलास येसगे कावळगावकर

96
0

राजेंद्र पाटील राऊत

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे सोमवारी धरणे आंदोलन- कैलास येसगे कावळगावकर नांदेड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी खरीप 2020 साठी इपको, टोकियो या कंपनीकडे पिक विमा भरला होता. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तरी परंतु क्लेम दाखल केलेल्या मोजक्याच शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने पीक विमा मंजूर करून पीक विमा भरलेल्या इतर शेतकऱ्यावर मोठा अन्याय केला आहे. म्हणून शेतकरी ,कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने देगलूर, बिलोली, मुखेड ,कंधार, धर्माबाद, नायगाव, अर्धापुरसह संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील हजारो शेतकरी 14 डिसेंबर रोजी सोमवारी सकाळी 11 वाजता नवीन मोंढा येथील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयासमोर येण्याचे आव्हान प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष कैलास येसगे कावळगावकर यांनी केले आहे. बच्चुभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांसाठी बाईक रॅली घेऊन स्वतः बाईकवर दिल्लीला जाऊ शकतात. तर आपण नांदेड ला जाऊ शकत नाही का? म्हणून मिळेल त्या वाहनाने येण्याचे आवाहन केले आहे. (संजय कोकेंवार युवा मराठा न्युज नेटवर्क नांदेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here