Home महाराष्ट्र  मराठा क्रांती मोर्चाचा आझाद मैदानात..! १४ आणि १५ डिसेंबरला उपोषण 

 मराठा क्रांती मोर्चाचा आझाद मैदानात..! १४ आणि १५ डिसेंबरला उपोषण 

105
0

राजेंद्र पाटील राऊत

मराठा क्रांती मोर्चाचा आझाद मैदानात..! १४ आणि १५ डिसेंबरला उपोषण
मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाला मिळालेल्या स्थगिती आदेशापूर्वी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या ईएसबीसी आणि एसईबीसी उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी उपोषण करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या 10 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत समन्वयकांनी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी एक डिसेंबर रोजी उमेदवारांच्या नियुक्तीसाठी महावितरणसमोर आंदोलन करण्यात आले आहे. शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्ग तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील नोकरीसाठी नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाडी मोर्चास प्रतिबंध घातला आहे. यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील आणि आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागणार आहे. ईएसबीसी आणि एसईबीसी उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न, सारथी संस्था गतिमान करणे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, कोपर्डीतील आरोपीचा खटला, मराठा आंदोलनातील तरुणांवरील उर्वरित खटले मागे घेणे यांसह इतर मागण्या सोडविण्यासाठी आमदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सोडवावेत, असे आवाहन सकल मराठा समाज- मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नसल्यास आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घ्यावी.

याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधावा यासाठी मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक आमदाराला निवेदन देणार आहे….⭕

Previous articleपीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे सोमवारी धरणे आंदोलन- कैलास येसगे कावळगावकर
Next articleशिवडी – वरळी कनेक्टर संदर्भात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here