Home नाशिक ओझर येथील नवीन इंग्रजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी वाजवली २६ वर्षांनंतर शाळेची घंटा—

ओझर येथील नवीन इंग्रजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी वाजवली २६ वर्षांनंतर शाळेची घंटा—

136
0

आशाताई बच्छाव

IMG-20230528-WA0043.jpg

ओझर येथील नवीन इंग्रजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी वाजवली २६ वर्षांनंतर शाळेची घंटा—

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

ओझर तालुका निफाड येथील नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नवीन इंग्रजी शाळेच्या १९९७ बॅच च्या विद्यार्थ्यांनी तब्बल २६ वर्षानंतर शाळेत येऊन गतकाळातील आठवणींना स्नेहमेळाव्यात उजाळा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.यावेळी व्यास पिठावर ज्येष्ठ शिक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष त्रिंबकराव तिडके,बाळासाहेब भडके, यशवंत चौधरी,अशोक पाटील,नितीन पाटील,दिलीप अहिरे,दिनेश देव रे, आनंदा वाणी,मधुकर पगारे,उमेश कुलकर्णी,ज्योती कुलकर्णी,लतिका पाटील,अशोक गवांदे व तत्कालीन गुरुजन उपस्थित होते.
स्नेहमेळाव्यात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले ,राष्ट्रगीत,श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विद्यार्थ्याच्या हस्ते सर्व गुरुजनांचा यथोचित सत्कार करण्यात आला व कृतज्ञतापूर्वक वंदन केले गुरुजनांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न मनोगतातून केला,यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख व सध्या कार्यरत असलेल्या क्षेत्राची ओळख करून देत शाळेच्या आठवणी सांगितल्या.दिवसभर गडबड,गोंधळ चां अनुभव आनंद घेतला,खूप वर्षानंतर भेटल्याने वेगळाच अनुभव होता.
यावेळी सचिन क्षीरसागर,अनंत कुलकर्णी,दीपक पेठकर,दीपक माळोदे,प्रीती नारखेडे,प्राजक्ता शौचे,नीलिमा तांबट,जयश्री हाडोळे,गीतांजली पेंढारकर,रोहिणी गवांदे,सोनाली बोरसे,तुषार भडके,वीणा देशपांडे,अनिता शिंगाडे,अश्विनी मंडलिक,सुनीता चौरे,कोमल अक्कर,रश्मी झांबरे, आरती आहेर,वैशाली शिंदे,भारत केदारे,विनोद विधाते,प्रकाश गवळी,सुरेश कानडे,खंडू मढे,राकेश जगताप,कैलास पगार,रवी गवारे,राहुल जाधव,संदीप शार्दुल,प्रवीण बोरस्ते,राजू जाधव,इम्रान पठाण,अफजल पठाण,अरविंद भिडे,दिलीप गायकवाड,कैलास रासकर,सचिन मंडलिक,अनुप तांबट,भालचंद्र जाधव, योगेश शिंदे,देवेंद्र गायकवाड,संजय विश्वकर्मा यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते व स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Previous articleशेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पीक विमा कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल—
Next articleशासकिय योजनांची माहिती शासन आपल्या दारी खेडलेपरमानद येथे जनप्रतिसादात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here