Home नाशिक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पीक विमा कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल—

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पीक विमा कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल—

166
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230528-065906_Chrome.jpg

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पीक विमा कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल—

शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून केली फसवणूक

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

विमा कंपनीने कमी नुकसान दाखवत परस्पर पाहणी अहवाल तयार करून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान केल्याने संबंधित कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खेडलेझुंगे येथील शेतकरी रामेश्वर शांताराम शिंदे व इतर ३ शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे माहे ऑगस्ट २०२२ रोजी नुकसान झाले होते. त्यांनी सदर कंपनीचा पीकविमा काढलेला असल्याने त्यांनी संबंधित कंपनीस नुकसानी बाबत कळवले होते. भारत सरकारद्वारे प्रधानमंत्री पीक योजना ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पिकविलेल्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावे म्हणून राबविली जाते. त्यासाठी एच.डी.एफ.सी.ऍग्रो या कंपनीने ग्लोबल या कंपनीला नाशिक जिल्ह्याचे सर्व्हे करण्याचे काम दिले होते. मात्र कंपनीचे संदीप प्रभाकर पावडे, क्षेत्रीय कर्मचारी सर्व्हेक्षण अर्क कंपनी, पिंप्री महिपाल, नांदेड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता परस्पर विहित नमुन्यातील फॉर्म भरला. त्यात त्यात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात झालेल्या नुकसानी पेक्षा कमी नुकसान दाखवले. त्यावर शेतकऱ्यांच्या सह्या न घेता खोट्या सह्या करून शेतकरी व कृषी सहाय्यकाची दिशाभूल करून त्यावर कृषी सहाय्यक यांची सही घेऊन संबधित शेतकरी व कृषी विभागाची फसवणूक केली म्हणून फिर्यादी दीपक नानासाहेब सोमवंशी (वय ३७) यांचे फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाणे येथे सी.सी.टी.एन.एस गु.र.न.११५/२०२३ भा.दं.वि.४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Previous articleशिवसेना आमदार लता सोनावणे यांच्या कारला मोठा अपघात, डंपरने दिली जोरदार धडक
Next articleओझर येथील नवीन इंग्रजी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी वाजवली २६ वर्षांनंतर शाळेची घंटा—
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here