🛑 पुणे जिल्हासाठी !..राजेश टोपे यांचा कठोर निर्णय! 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे:⭕ कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई पॅटर्न आता पुणे शहर आणि जिल्ह्यातही लागू केला जाईल, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पुण्यातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
यासोबतच मुंबई महानगगरपालिकेने खाजगी रूग्णालयातील बेड्स ताब्यात घेतले असून या रूग्णालयात एका जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही राजेश टोपे यांनी जाहीर केला.
या अधिकाऱ्यांना रूग्णालय व्यवस्थापनाच्या मदतीने एक फ्लोचार्ट तयार करावा लागणार आहे. यासोबतच रूग्णालयात असलेल्या आयसीयू बेड, व्हेंटीलेटर बेड.
पीपीई कीट व मास्क या बाबी नमूद करण्याचे आदेशही या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील मुंबई व पुणे शहरात कोरोनाचा संक्रमणाचा वेग अधिक आहे. कोरोना बाधितांच्या आकड्यांत भयावह वाढ झाली असताना आरोग्य प्रशासनानं कठोर निर्णय घेतल्याचं पहायला मिळत आहे.⭕
