Home जळगाव शिवसेना आमदार लता सोनावणे यांच्या कारला मोठा अपघात, डंपरने दिली जोरदार धडक

शिवसेना आमदार लता सोनावणे यांच्या कारला मोठा अपघात, डंपरने दिली जोरदार धडक

203

आशाताई बच्छाव

IMG-20230527-WA0066.jpg

शिवसेना आमदार लता सोनावणे यांच्या कारला मोठा अपघात, डंपरने दिली जोरदार धडक

जळगाव तालुक्यातील चोपडा-जळगाव रस्त्यावर शिवसेनेच्या आमदार लता सोनावणे यांच्या कारला मोठा अपघात झाला आहे. येथे एका डंपरने त्यांच्या कारला धडक दिल्याने आमदार सोनावणे व माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांना मुका मार लागला आहे.

जळगाव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदार लता सोनावणे यांच्या गाडीला डंपरने धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात त्या बालंबाल बचावल्या आहेत. जळगाव तालुक्यातील चोपडा जळगाव रस्त्यावर करंज गावा जवळ शनिवारी हा अपघात घडला आहे.

आमदार लता सोनवणे ह्या त्यांचे पती माजी आमदार, प्राध्यापक चंद्रकांत सोनावणे यांच्या सोबत वाहनाने चोपडा कडून जळगाव कडे येत होत्या. चोपड्या हून जळगाव कडे येत असताना जळगाव कडून चोपडा कडे जाणाऱ्या डंपरने आमदार लता सोनवणे यांच्या इनोव्हा गाडीला धडक दिली. मात्र दैव बलवत्तर म्हणून केवळ मुका मार लागल्याने दोन्ही जण बचावले आहेत. या घटने नंतर पोलिसांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

या अपघातात मुका मार लागला असून केवळ नशीब चांगले म्हणून आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी दिली आहे. या विषयी पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
मात्र या अनुषंगाने या मुजोर डंपर चालकांवर कठोर कार्यवाही होऊन या डंपरवाल्यांची मुजोरी बंद होईल का? या आधी देखील बऱ्याच वेळा असे अपघात या डंपर चालक लोकांकडून झालेले असताना देखील यांच्या वर काहीच कठोर कारवाई होत नाही. असा प्रश्न सर्व सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

Previous articleमहा जनसंपर्क अभियान यशस्वी करा भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांचे आवाहन
Next articleशेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पीक विमा कंपनीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल—
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.