Home उतर महाराष्ट्र शासकिय योजनांची माहिती शासन आपल्या दारी खेडलेपरमानद येथे जनप्रतिसादात संपन्न

शासकिय योजनांची माहिती शासन आपल्या दारी खेडलेपरमानद येथे जनप्रतिसादात संपन्न

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20230528-WA0021.jpg

शासकिय योजनांची माहिती शासन आपल्या दारी खेडलेपरमानद येथे जनप्रतिसादात संपन्न          सोनई //वार्ताहर कारभारी गव्हाणे //

शासकीय योजनांची जत्रा म्हणजेच शासन आपल्या दारी या शासनाच्या योजने अंतर्गत खेडले परमानंद येथे जनतेच्या विविध प्रश्नां संदर्भात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांचे समाधान करून विविध योजना संदर्भात माहिती दिली.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते सूर्यभान आघाव हे होते.खेडले परमानंद ग्रामस्थ त्याचप्रमाणे वाड्या वस्त्या वरील अनेक महिला व पुरुष नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

सूर्यभान आघाव यांनी इरिगेशन विभागाच्या चाऱ्यांचा सर्वे करून त्या वेळीच दुरुस्त करण्यात याव्यात यासंबंधीची मागणी शासन दरबारी केली.

खेडले परमानंद ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी धनाजी फरताडे यांनी शासन स्तरावर असणाऱ्या ग्राम विकासाच्या विविध योजना संदर्भात माहिती व कागदपत्रांचा पाठपुरावा कसा करावा यासंबंधीची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली,

कृषी सहाय्यक प्रगती रौंदळ यांनी शेती व शेती उद्योगावर आधारित शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली व यासंबंधी सर्व ती मदत व माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते, गरोदर महिलांसाठी लसीकरण आहार याविषयीची माहिती त्यांनी ग्राम त्यांनी ग्रामस्थांना दिली.

प्रसूती काळात शासनाकडून मिळणारी विविध प्रकारची मदत व त्यासाठी आवश्यक कागदपत्र यासंबंधी मार्गदर्शन केले.

महसूल विभागाचे तलाठी भाऊसाहेब नवाळे यांनी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना महसूल विभागाशी संबंधित अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटावे तुमच्या अडचणी सोडवण्यात येतील शेतकऱ्यांच्या नोंदी अगदी पाच रुपयाचे तिकीट लावून मोफत करण्यात येतील अशी माहिती दिली.महसूल विभागाचे तलाठी भाऊसाहेब नवाळे यांनी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना महसूल विभागाशी संबंधित अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटावे तुमच्या अडचणी सोडवण्यात येतील शेतकऱ्यांच्या नोंदी अगदी पाच रुपयाचे तिकीट लावून मोफत करण्यात येतील अशी माहिती दिली.

सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस या कार्यक्रमाला उपस्थित होत्या .

धान्य दुकानदार गुडधे यांनी दिनांक 29 रोजी सोनई जगदंबा मंदिर प्राणांगणात आयोजित करण्यात आलेल्या रेशन कार्डच्या विविध समस्यांच्या कॅम्प विषयी माहिती दिली.

या कार्यक्रमाला खेडले परमानंद ग्रामपंचायतचे उपसरपंच जावेद इनामदार, दादासाहेब रोठे, दादासाहेब तूवर,भाऊसाहेब मोकाशी,मोहम्मद इनामदार, राजाबापू शिंदे, माऊली तुवर, नयुम इनामदार, भाऊसाहेब राजाळे, अशोक शिंदे, फकीर मोहम्मद हवालदार,भाऊसाहेब शिंदे, आबासाहेब राजाळे , भानुदास शिंदे,बापु बर्डे, राजेंद्र बनकर योगेश रोठे, इस्माईल शेख, अरुण तागड, छबु वैरागर, कृष्णा राऊत, राहुल भुजबळ,प्रशांत तुवर,रोहिदास बर्डे,दत्तात्रय , संदीप केदारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here