Home नांदेड देगलुर शहर जिल्हा घोषित करण्यात यावा देगलूर तहसील कार्यालया मार्फत मुख्यमंत्री एकनाथ...

देगलुर शहर जिल्हा घोषित करण्यात यावा देगलूर तहसील कार्यालया मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे मागणी

66
0

आशाताई बच्छाव

IMG-20230528-WA0022.jpg

देगलुर शहर जिल्हा घोषित करण्यात यावा देगलूर तहसील कार्यालया मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे मागणी

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क

नांदेड जिल्ह्यातील देगलूर हा उपजिल्हा असुन आंध्रा- तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्र राज्य, आग्नेय दिशेला तेलंगाणा, वायव्य दिशेला कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र असे तीन राज्याच्या सीमेवर वसलेला देगलूर हे एकमेव शहर आहे देगलूर हे विद्येचे माहेरघर आहे हे इतिहास कालीन देवग्राम नगरी – आत्ताचे देगलूर (उपजिल्हा) असून या शहराचे आठवडी बाजार, मोठमोठे चिकित्सालय दवाखाने, पंचकर्म, अडत व्यापारी लाईन, सराफा बाजारपेठा, मोठे वस्त्रालयांचे शोरूम, मोठमोठ्या गाड्यांचे शोरूम, भांड्याचे शोरूम, व शहरातील येणारे छोटे मोठे व्यापारी, शेतकरी, व सर्व सोयीयुक्त देगलूर शहर असून येथे शहरालगत देगलुर तालुक्यातील जवळपास १०० – १२५ खेडेगावांचा संपर्क आहे. त्यात 5 कि.मी. अंतरावर आंध्र-तेलंगणा (सिमाभाग) राज्यसिमेतील १००- १५० किलोमीटर अंतरावरील गावांचा व तालुक्यातील तसेच कामारेड्डी, हैदराबाद जिल्ह्य़ातील व ८ ते १५ कि.मी. कर्नाटक (सिमाभाग) राज्यांतील बिदर पोहरादेवी पर्यंत गावांचा देखिल संपर्क आहे. *देवग्राम नगरी* हे एक सीमेवरचा शहर असून याच्या पूर्वेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटकाची सीमा आहे. या भागावर इ. स. १७२७ पासून ते १९४८ पर्यंत हैद्राबादच्या निजामाची सत्ता होती. निजामी राजवटीचा प्रभाव आणि तीन प्रांतांच्या सीमा यामुळे मराठी, कन्नड, तेलगू आणि हैद्राबादी उर्दू भाषेचा मिलाफ येथे आढळतो. मराठी, तेलुगू, हिंदी, कन्नड, वाणी, इंग्रजी, गुजराती, केरळ, मल्याळम ई. सोबतच निजाम काळात येथील राजभाषा आणि शिक्षणाचे माध्यम उर्दू होते. अनेक भाषिक बोलीभाषा आणि संस्कृतीचा प्रभाव येथे अधोरेखित होतो. देगलूर परिसराचा दिशानिर्देश देखील वैविध्यदर्शकच आहे. संतवांङमय इतिहास काळातील सद्गुरू श्री गुंडामहाराज मंदिर, संत चुडामणी मंदिर, आर्यसमाज मंदिर व करडखेड येथील शिवालय व शासकीय विश्रामगृह च्या बाजुला दर्गा जुनी इतिहास, शेळगाव येथील इतिहास कालीन स्वयंभु नृसिंह मूर्ती भगवान मंदिर, ब्रम्हकुमारी ई. सर्व प्रकारच्या विविध जातीधर्माचे लोक एक जुटीने राहतात. व विविध सणउत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात. देगलुर शहर येथील मोठी बाजारपेठ, मोंढा प्रसिद्ध आहे. शनिवार आठवडी बाजार (मोठे बाजार पेठ असून ) नांदेड, परभणी, हदगाव, गंगाखेड, उदगीर, मुखेड येथून देखील लोक आपल्या शहरातील बाजारपेठ येथे व्यवसाय व खरेदी साठी येतात. लेंडी नदी ही देगलूर शहरातून वाहणारी मुख्य नदी आहे. अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे देगलूर महाविद्यालय, धुंडा महाराज महाविद्यालय, साधना हायस्कूल, मानव्य विकास विद्यालय या शैक्षणिक संस्था आहेत. प्राचिन जगप्रसिद्ध हेमाडपंथी शिव मंदिर सिद्धेश्वर मंदिर हे होट्टल देगलूर येथे प्रसिद्ध आहे. देगलूर येथे मोठे घुमट आहे. त्यावर असलेले कोरीव काम हे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. दगडावरील कोरीवकाम *नादब्रम्ह गणेश मूर्ती* विलोभनीय आहे. देगलुर होट्टल येथे दरवर्षी होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. देगलुर शहरातील येरगी येथे नुकतेच सापडलेले चालुक्य कालीन शिलालेख व तीस फुट खोल बारवांचा जुन्या काळात पिण्याच्या पाण्याचा स्रोत असुन परवाच स्वतः जिल्हाधिकारी तसेच तज्ञांनी भेट देऊन पाहणी केली. व नांदेड देगलुर बिदर नवीन रेल्वे मार्ग निर्मिती करण हे शहरातील जनतेसाठी दळणवळणाची यंत्रणा आहे. तेही लवकरच पूर्ण करण्याचे शासनाने हमी दिले आहे. अशा सर्व सोयींयुक्त इतिहास काळातील तिनराज्याच्या सिमिवर वसलेले देवग्राम नगरी आत्ताचे देगलुर शहर हे जिल्हा होणे गरजेचे असुन देगलुर शहर जिल्हा व्हावे हि बर्‍याच वर्षांपासून खूप जूनी मागणी असुन वारंवार संपर्क साधून पाठपुरावा करून देखील यावर अद्याप चर्चा किंवा विचार विनिमय करण्यात आली नाही. सर्व सोयींयुक्त शहर असुन याकडे मात्र राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याचा बाब समोर येत आहेत. आपल्या मागणी नंतर कालपरवा ची मागणी उदगीर शहराचे नाव जिल्हा यादीत समाविष्ट करण्यात आले पण देगलुर जिल्हा करण्यात यावे हि खुप जुनी मागणी आत्ता पर्यंत तरी यावर निर्णय घेण्यात आला नाही. खुप जुनी मागणी व परीपूर्ण सर्व सोयींयुक्त देगलुर शहर विद्येचे माहेरघर आहे. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन सर्व शिष्टमंडळाशी बैठका घेऊन चर्चा करुन सध्या नांदेड जिल्ह्यातील देवग्राम नगरी आत्ताचे देगलुर हे नाव नवीन जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट करण्यात यावे. अन्यथा शासननियमानुसार तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी म्हटले आहे…

Previous articleशासकिय योजनांची माहिती शासन आपल्या दारी खेडलेपरमानद येथे जनप्रतिसादात संपन्न
Next articleश्री संत भीमा भोई महाराज यांची जयंती उत्सहात साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here