Home जळगाव चुंचाळे ग्रामसेविकेला सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या लेखी आश्वासना नंतर महिला सरपंच व सदस्यांचे...

चुंचाळे ग्रामसेविकेला सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या लेखी आश्वासना नंतर महिला सरपंच व सदस्यांचे उपोषण मागे

85
0

आशाताई बच्छाव

IMG-20230624-WA0002.jpg

चुंचाळे ग्रामसेविकेला सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या लेखी आश्वासना नंतर महिला सरपंच व सदस्यांचे उपोषण मागे

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

यावल : यावल पंचायत समिती समोर चुंचाळे ग्रामपंचापतच्या महिला सरपंच व सदस्यांनी ग्रामसेविकेची बदली करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांना गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेला सक्तीच्या रजेवर पाठवून तेथे प्रभारी ग्रामसेवक नियुक्त करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी उपोषण मागे घेण्यात आले.
आश्वासनानंतर उपोषण मागे यावल पंचायत समिती समोर गुरूवारी चुंचाळे, ता.यावल येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच नौशाद मुबारक तडवी, उपसरपंच मनोज फकीरा धनगर यांच्यासह सर्व सदस्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांच्या बदलीसाठी करण्यात आलेल्या या उपोषणकर्त्यांची सायंकाळी जिल्हा परीषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, भाजपाचे उजैन्नसिंग राजपूत, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, भाजपाचे विलास चौधरी, युवा मोर्चाचे सागर कोळींसह पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्यासोबत चर्चा करीत प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांना ग्रामसेविका यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चुंचाळे ग्रामपंचायतीच्या तूर्त कारभार ग्रामसेवक हेमंत जोशी यांच्याकडे सोपवण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Previous articleवनसगांव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा  योगासने व प्राणायामामध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
Next articleधांद्री गावातील शेतकरी परीवारातील मुलगी झाली इंजिनिअर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here