Home रत्नागिरी 75 वा स्वातंत्र्यदिन चाफे नं 1 शाळेत उत्साहात संपन्न

75 वा स्वातंत्र्यदिन चाफे नं 1 शाळेत उत्साहात संपन्न

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0049.jpg

75 वा स्वातंत्र्यदिन चाफे नं 1 शाळेत उत्साहात संपन्न                                                               रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जि. प. पू. प्रा. शाळा चाफे नं 1 येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यामध्ये विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच बरोबर रांगोळी प्रदर्शन, रानभाज्या प्रदर्शन, वृक्षारोपण, राखी तयार करणे,स्वराज्यातील किल्ल्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या सर्व स्पर्धा व उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले या सर्व उपक्रमांचे पुस्तक रूपाने गाव प्रमुख गावकर श्री चंद्रकांत गोवळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

शाळेतील उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत चाफे सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष श्री रवींद्र गोवळकर व सर्व सदस्य, माता पालक संघ प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाषजी गोवळकर ,पोलीस पाटील हिराजी तांबे माजी मुख्याध्यापक श्री मुळ्ये गुरुजी श्री सुनील राहाटे तसेच सर्वच पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शाळेतील शिक्षकांनी सर्वच उपक्रमाचे उत्तम नियोजन केले. होते केंद्रप्रमुख श्री कलंबटे विस्तार अधिकारी सौ मोहिते यांनी विशेष दखल घेऊन अभिनंदन केले.

Previous articleईगल स्केटर्स क्लब,दापोलीच्या खेळाडूंचा विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न..!
Next articleजिंदल विद्यामंदिर प्रशालेत आझादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here