Home रत्नागिरी ईगल स्केटर्स क्लब,दापोलीच्या खेळाडूंचा विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न..!

ईगल स्केटर्स क्लब,दापोलीच्या खेळाडूंचा विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न..!

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0050.jpg

ईगल स्केटर्स क्लब,दापोलीच्या खेळाडूंचा विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न..!             रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ईगल स्केटर्स क्लब,दापोलीचे खेळाडू कु. प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे आणि कुमारी सई महेश महाडिक यांनी आपल्या महान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत पारंपारिक वेशभूषेत 1 तास स्केटिंग करत वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, ग्लोबल जीनियस रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचा अटेम्प्ट यशस्वी रित्या पूर्ण केला.

या दोघांचा उत्साह वाढवण्यासाठी कु. साहिल गडदे याने या खेळाडूंसोबत रेकॉर्ड पूर्ण होईपर्यंत स्केटिंग केले.
स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्हातून २२०० स्केटिंग खेळाडूनी एकाचवेळी सर्वत्र आपआपल्या शहरात संध्याकाळी ५.००ते ६.००वाजेपर्यत १तास न थांबता राष्ट्रध्वज हातात घेवून स्केटिंग करत रेकॉर्ड अटेम्प्ट पुर्ण केला.

रेकॉर्ड अटेम्प्ट पुर्ण केल्याबद्दल प्रद्युम्न दाभोळे आणि सई महाडीक यांना दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. श्री. विवेक अहीरे यांच्या हस्ते मेडल देऊन गौरवण्यात आले. या दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री प्रथमेश दाभोळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हा रेकॉर्ड अटेम्प्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सौ. प्रिती दाभोळे व श्री.शैलेश मिसाळ यांनी काम पाहिले.

या सर्व यशस्वी खेळाडूंनाभटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष्या सौ. संपदा पालकर, डॉ. सौ.विद्या दिवाण, श्री. महेश्वर जाधव,पोलिस अंमलदार श्री. विकास पवार,श्री.प्रदिप रजपुत, श्री. अनिरुद्ध कदम श्री. योगेश कदम, श्री.महेश व सौ.अपूर्वा महाडीक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंवर दापोलीतून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Previous articleकडवईत रिक्षा संघटना, व्यापारी संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने सामूहीक राष्ट्रगीत गायन
Next article75 वा स्वातंत्र्यदिन चाफे नं 1 शाळेत उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here