Home रत्नागिरी कडवईत रिक्षा संघटना, व्यापारी संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने सामूहीक राष्ट्रगीत गायन

कडवईत रिक्षा संघटना, व्यापारी संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने सामूहीक राष्ट्रगीत गायन

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0056.jpg

कडवईत रिक्षा संघटना, व्यापारी संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने सामूहीक राष्ट्रगीत गायन                       रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) 

संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे महाराष्ट्र् शासनाच्या आदेशाचे पालन करत आज रिक्षा संघटना, व्यापारी संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने सामूहीक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी बाजारपेठेतील सर्वांनी यात सहभाग घेतला.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनही सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुधवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्रभर राष्ट्रगीत गायनाचे आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्या वतीने कडवई बाजारपेठ येथे सामूहीक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यापारी संघटना व उपस्थित ग्रामस्थानी जागीच उभे राहून यात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here