Home नाशिक वनसगांव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा  योगासने व प्राणायामामध्ये विद्यार्थी व...

वनसगांव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा  योगासने व प्राणायामामध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

299

आशाताई बच्छाव

IMG-20230623-WA0008.jpg

वनसगांव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

योगासने व प्राणायामामध्ये विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

वनसगांव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात आज बुधवार दि.२१ जून २०२३ रोजी ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.रोटे व पर्यवेक्षक के .बी.दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड विभागांतर्गत योगासनांची व प्राणायामाची माहितीसह प्रात्यक्षिके घेण्यात आली. याप्रसंगी लासलगाव येथील योगशिक्षक भूषण वडनेरे हे उपस्थित होते .त्यांनी योगपूर्व प्राथमिक हालचाली, वृक्षासन, ताडासन ,मयुरासन ,शशकासन मंडूकासन अशा विविध आसनांची माहिती देताना आसनाचे नियम व आरोग्य संवर्धनासाठी होणारे फायदे याविषयी प्रात्यक्षिकांसह अतिशय सुरेख रित्या विवेचन केले. त्याचप्रमाणे प्राणायाम, भ्रमरी, अनुलोम-विलोम ,कपालभाती, हास्ययोग ,ध्यान, आनापानक्रिया यांचीही माहितीसह प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग करवून घेतला. योगशिक्षक भूषण वडनेरे यांचे सह स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य शिवाजीनाना शिंदे, प्राचार्य सी.डी रोटे,पर्यवेक्षक के. बी .दरेकर, स्काऊट गाईड विभाग प्रमुख दिपक गायकवाड ,अर्जुन चव्हाण,बाळासाहेब गांजवे यांचे सह शिक्षक- शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी योगासनांच्या प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.विद्यार्थी व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व पालक असे एकुण ८०० व्यक्तींनी योगसनांमध्ये सहभाग घेतला.
योगदिन यशस्वीतेसाठी उपशिक्षक अर्जुन चव्हाण, भिका भवर ,मनीराम महाले,अरविंद वसावे ,अरुण वाघ, बाळासाहेब गांजवे, आनंदा आहिरे, प्रीती काळे, कुंदन जाधव , दिपक गायकवाड,ज्ञानेश्वर कुशारे, उमा चव्हाण, ममता वळवी, सुनील गांगोडे, संदीप वन्से, उमेश कुमावत, रत्नाकर केदारे ,मनिषा मेनगर, विजय पांगुळ ,योगिता जाधव ,गणेश कोलते,सुनीता शिंदे, वैशाली रायते, सोमनाथ जाधव, अश्विनी पोकळे, अक्षय सोमवंशी ,नितीन निकम,भाऊसाहेब धामणे ,प्रशांत शिरसाट , शांताराम पवार आदींनी परिश्रम घेतले.

Previous articleठेंगोडयाची जिल्हा परीषद शाळा धोखेदायक     
Next articleचुंचाळे ग्रामसेविकेला सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या लेखी आश्वासना नंतर महिला सरपंच व सदस्यांचे उपोषण मागे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.