Home Breaking News शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला “कोरोना” आहे ! भाजप आमदार गोपीचंद...

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला “कोरोना” आहे ! भाजप आमदार गोपीचंद पडवळ यांची टिका. ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

67
0

🛑 शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला “कोरोना” आहे !
भाजप आमदार गोपीचंद पडवळ यांची टिका.🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

⭕:-भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत जहरी भाषेत टीका केली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरनो आहेत, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यासंबंधात वक्तव्य केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलत होते. दरम्यान, भाजपने मात्र पडळकर यांचे हे व्यक्तीगत मत आहे. पक्ष त्याच्याशी सहमत नाही. आम्ही पक्ष म्हणून शरद पवार यांचे विरोधक आहोत. त्यांच्या काही भूमिका आम्हाला मान्य नाहीत.
हे खरे आहे मात्र त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले की, ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असे माझे मत आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांची बहुजनांबद्दलची भूमिका आता सर्वसामान्य जनतेलाही लक्षात येऊ लागली आहे. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाबद्द पवार ज्या पद्धीतीने वागतात ते पाहिले असता गावगाड्यातील तळागाळातील समाजाशी ते कसा विचार करत असती, हेही आता लोकांच्या लक्षात येत आहे.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे’, असे पडळकर म्हणाले.
कोरोना व्हायरस संकटाची पार्श्वभूमी विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांनी येत्या काळात विठ्ठल-रुक्मिणी पुजेसाठी पंढरपुरात येणे टाळावे. तसेच, पुजेचा मान एखाद्या सर्वासामान्य भक्ताला द्यावा अशी मागणीही पडळकर यांनी या वेळी केली. या आधीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते पदावर असताना वारकऱ्यांनी विठ्ठल पुजेसाठी विरोध केला होता. तेव्हा त्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठल-रुक्मिणी पुजा केली होती. तशाच प्रकारे या वेळीही मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला येणे टाळावे. मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला तर सर्वसामान्य वारकऱ्यांनाही त्याचा अभिमान वाटेल, अशी भावना पडळकर यांनी व्यक्त केली…⭕

Previous articleसरकारी कर्मचार्‍यांना झटका ! ७ व्या वेतन आयोगाबाबत राज्य सरकारने काढला नवीन आदेश ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next articleकोरोना योद्धे- इनामदार कोरोनावर मात करून नागरिकांच्या सेवेसाठी रूजू ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here