Home सामाजिक काळाचा महिमा —  मित्र,सखा थाॅमस च्या जाण्याने मित्रपरिवार हळहळला

काळाचा महिमा —  मित्र,सखा थाॅमस च्या जाण्याने मित्रपरिवार हळहळला

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20230406-WA0119.jpg

काळाचा महिमा —

मित्र,सखा थाॅमस च्या जाण्याने मित्रपरिवार हळहळला

८/१० दिवसापूर्वी अचानक रात्री फोनची घंटा वाजली आणि समोरून बाल मैत्रिणीचा आवाज आला आणि आपला बालमित्र थॉमस याच दुःखद निधन झालं अशी बातमी दिली.अचानक अशी कशी एक्झिट झाली आपल्या आयुष्यातून याची.क्षणभर कानावर विश्वासच बसत नव्हता आणि अक्षरशः गेले कित्येक दिवस मन बालपण जिथे गेलं काळाचौकी पोलीस लाईन मुंबई येथे वावरत होते सुखदुःख याच्या आठवणींचा हिंदोळा नुसता झुलत होता सुन्न मनाने रिक्त अंतःकरणाने. बालमित्र ही संकल्पना नाही तर एक वास्तव आहे आपल्या आयुष्याचा मुख्य भाग. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यात ही गारव्यासारखा.. मैत्र, सखा, सोबती अशा अनेक भूमिका जपतो जो सुखात तुमच्या मागे आणि दुःख अडवायला तुमच्या सोबत असतो तो असतो मित्र आणि ते असते मैत्रीत्व.. खरं तर माणसाच्या जडणघडणीत सगळ्यात मोठा वाटा हा बालमित्र मैत्रिणीचा असतो बालमनावर रुजवलेले सामाजिक संस्कार, कर्तव्य, अनुकरण, ही पुढील आयुष्याचा पाया असतात. आयुष्यात प्रत्येकाचे एक वेगळं स्थान असते प्रत्येक नात्याला जाणीव कर्तव्याची किनार असते हृदयाचा एक अनमोल कप्पा असतो की जिथे मनातील भावना सारासार विचार बोलून दाखवले जातात. व्यक्त होता येते तो कप्पा म्हणजे मैत्री. कोणत्याही परिस्थितीत हे आपल्यापाठी ठाम असतात त्यांच्या उत्तम संगतीतच आपण मोठे होत असतो. जगातील सगळे ज्ञान फक्त माझ्या मित्राकडे ही जाणीव आपल्या मनाला असते त्यांची संगत खऱ्या अर्थाने आयुष्याची दिशा आहे म्हणून संगतीला अति महत्व आहे अर्जुनाचा सखा कृष्ण होता कर्ण दानशूर वीर योद्धा होता पण त्याचा सखा दुर्योधन होता. कृष्णाचा बाल सखा सुदामा कृष्णाच्याही जडणघडणीत सुदामाचे स्थान वरचेच आहे. अर्जुनाचा सखा कृष्ण अर्जुनाच्या आयुष्याचे सार मित्र सखा कृष्ण आहे. मैत्री दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे. मित्र तो जो तुमच्या आवाजावरून तुम्ही आनंदात आहात की दुःखात हे ओळखतो. खरं तर बालपणासह तारुण्या सामाजीक भावनेचा काळ माझा तसा मुंबईतील. नियतीने जरी आम्ही विखुरलो पण तरीही आजही तीच मैत्री तेच नातं मनात जपतो .सगळीच नाती जगाच्या नजरेतून बघायची नसतात कारण ती तशी बघितली तर ती दूषितच नक्की होतात. आमच्या या मित्राच्या जाण्याने खरंतर क्षणभंगुर जीवन हे शाश्वत सत्य आहे हे पुन्हा सिद्ध झालं.येणारा येतो जाणारा जातो पण अकस्मात हे कोणाचे ही जाणं मनाला चटका लावून जाते. दिवसेंदिवस आभासी दुनियेत सुख दुःख आभासी झालेत खरं तर ज्यांच्या बरोबर आपण वाढलो, खेळलो, सर्वांगीण विकास झाला आणि असे अचानक जाणं दुर्दैवी आपल्यासह कुटुंबावर किती वाईट परिस्थिती याची कल्पना करवत नसते. जीवन जगताना प्रत्येकाच्या पाठीवर मात्र थाप देऊन त्यावेळचा संघर्ष आजचा उत्कर्ष बनला आनंदाच्या संवेदना मनाला जाणवत असतात. भावपूर्ण श्रद्धांजली या एका शब्दात दुःखाची इतिश्री होते काळाचा महिमा दुसरे काय पण खरा मित्र असावा हे अंतरी वाटत असेल आपणही अपेक्षा स्वार्थ ओझं झटकून दुसऱ्याचे सच्चे मित्र झालं पाहिजे मैत्री ही पद,प्रतिष्ठा,वय यावर ठरत नसते किंबहुना त्यावर ती अवलंबून नसते ती असते विश्वासावर ठाम .समविचारी आवडीनिवडी असणारी मैत्री जुळते ते टिकते ही पण वेगळ्या आवडीनिवडी मतांतर यावर जुळते ते असते मैत्रीत्व खरंतर पोलीस लाईन प्रत्येक कुटुंबा आपलंच असतं पण मैत्रीची नात्याची तार फक्त काही जणांची दृढ होते त्यातीलच आम्ही कुलकर्णी पिंटो, शिंदे ,बावस्कर कुटुंब ज्यांचे ऋणानुबंध जुळले होते. त्यातील काही आशीर्वादरूपी हात निकळले आणि या मित्राच्या अचानक जाण्याने विखुरलेले मित्र-मैत्रिणी एक झालो पण हे बघायलाच थॉमस आमच्यात नाही हे मात्र दुर्दैव.

सौ स्मिता शेखर कुलकर्णी
ब्राह्मण महासंघ विश्वस्त

Previous articleफोनचा कॉल उचलायला गेली आणि पाचव्या मजल्यावरून पडली पुण्यात बिल्डरच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
Next articleवनसगांव विद्यालयात पदवीधर आमदार सत्यजित सुधीर तांबे यांची सदिच्छा भेट…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here