Home Breaking News टिक टॉक वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त..! म्हणाला माझ्या दोन बायका ढसाढसा...

टिक टॉक वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त..! म्हणाला माझ्या दोन बायका ढसाढसा रडल्या 🛑 ✍️ धुळे:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

138
0

🛑 टिक टॉक वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त..! म्हणाला माझ्या दोन बायका ढसाढसा रडल्या 🛑
✍️ धुळे:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

धुळे :⭕ आपण स्टार व्हावं, सेलिब्रिटी व्हावं, आपलेही चाहते असावेत असं प्रत्येकाला वाटतं आणि हे स्वप्नं साकार केलं ते टिकटॉकने (tiktok). भारतातील सर्वाधिक पसंतीतंच टिकटॉक अॅप. याने फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागालाही वेड लावलं. ग्रामीण भागातील लोकंही टिकटॉकवर स्टार (tiktok star) झाले, इतकीच नव्हे तर बहुतेकांनी कमाईही केली. मात्र आता भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर या स्टार्सवर मोठं संकट कोसळलं आहे. अशाच स्टार्सपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील दिनेश पवार धुळ्यात राहणारे दिनेश पवार आपल्या दोन बायकांसह टिकटॉक स्टार झाले. पवार आणि त्याच्या दोन पत्नी 90 च्या दशकातील बॉलीवूड गाण्यांवर डान्स करायचे. या व्हिडीओमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. शिवाय त्यांनी 30 लाख रुपयांची कमाई केली. टिकटॉकवर बंदीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण आता उद्धवस्त झाल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान दिनेश यांनी टिकटॉक व्हिडीओतून पैसे कमावल्याचं नाकारलं आहे, मात्र आपल्याला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. असं त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांमध्ये Tik Tok हे भारतात प्रचंड लोकप्रिय झालं आहे. देशातले अनेक तरुण Tik Tokच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत असून ते सेलिब्रिटीही झाले आहेत. आता देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत या App वर बंदी घातल्याने या स्टार्सचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय.
अनेक युवकांनी तर नोकरी सोडून असे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यातून त्यांना लाखोंची कमाईसुद्धा झाली आहे. या युवकांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या युवकांना अनेक कंपन्या स्पॉन्सरही करत आहेत. त्याचबरोबर त्यांना जाहिरातीसुद्धा मिळत आहेत. आता या तरुणांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे….⭕

Previous articleधकादायक! भाडेकरु महिलेस घरमालकसह नातेवाईकाने जीवंत जाळले प्रतिनिधी :- प्रविण अहिरराव नाशिक
Next articleघरबसल्या ऑनलाईन बनवा रेशन कार्ड 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here