Home Breaking News धकादायक! भाडेकरु महिलेस घरमालकसह नातेवाईकाने जीवंत जाळले प्रतिनिधी :- प्रविण अहिरराव नाशिक

धकादायक! भाडेकरु महिलेस घरमालकसह नातेवाईकाने जीवंत जाळले प्रतिनिधी :- प्रविण अहिरराव नाशिक

77
0

धकादायक! भाडेकरु महिलेस घरमालकसह नातेवाईकाने जीवंत जाळले प्रतिनिधी :- प्रविण अहिरराव नाशिक

नाशिक : नाशिक शहरात एक धक्कादयक घटना समोर आली आहे. 30 जूनला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एक भाडेकरु महिलेला घर मालक व नातेवाईक यांच्यात बाचाबाची झाली म्हणून जिवंत जाळण्यात आले. याप्रकरणी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून घरभाडे थकले होते. त्याबाबत घरमालकाकडून तगादा सुरू होता. गेल्या मंगळवारी (ता. 30) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संशयित घरभाडे घेण्यासाठी गेले असता त्यावरून बाचाबाची झाली.शहरातील आयेशा असिम शेख (18, रा. भारतनगर, वडाळारोड) असे मयत महिलेचे नाव आहे. बबू (पूर्ण नाव नाही), अश्रम बाबुलाल शेख (32, रा. शिवाजीवाडी, भारतनगर), राणी, अमन (पूर्ण नावे नाहीत) अशी संशयितांची नावे आहेत. आयेशा शेख यांच्या फिर्यादीनुसार, पती असिम व मुलगा यांच्यासह त्या भारतनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. गेल्या काही महिन्यांपासून घरभाडे थकले होते.त्यावेळी संशयित बबू, अश्रफ व राणी यांनी आयेशा शेख हिच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले, असे आयेशा हिने कार्यकारी दंडाधिकारी हेमंत पोटिंदे यांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. गंभीररित्या भाजलेल्या आयेशा यांना तिचे पती असिम यांनी गेल्या मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, बुधवारी (ता. 1) रात्री मृत्यु झाला.

Previous articleमक्यावरील अळीच्या थैमानाने शेतकरी त्रस्त डांगसौंदाणे,(अशोक बहिरम प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)-
Next articleटिक टॉक वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त..! म्हणाला माझ्या दोन बायका ढसाढसा रडल्या 🛑 ✍️ धुळे:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here