• Home
  • मक्यावरील अळीच्या थैमानाने शेतकरी त्रस्त डांगसौंदाणे,(अशोक बहिरम प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)-

मक्यावरील अळीच्या थैमानाने शेतकरी त्रस्त डांगसौंदाणे,(अशोक बहिरम प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)-

मक्यावरील अळीच्या थैमानाने शेतकरी त्रस्त

डांगसौंदाणे,(अशोक बहिरम प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)-

बागलाण l बागलाण तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मका पिक लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.मात्र मागील वर्षापासून मका पिकावर पडत असलेल्या अमेरिकन अळीचे नवीन संकट शेतकरी वर्गापुढे उभे ठाकले आहे. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी साठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरु आहे.अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट कोसळले आहे .यावर फवारणी करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च करावा लागत असल्याने शेतकरी पूर्ण कोलमडून गेला आहे.

बागलाण तालुक्यात यावर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने शेती मशागतीची कामे पूर्ण करीत जून महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या पावसावर मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली.मात्र उगवण झालेल्या मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीने थैमान घातले असून विविध उपाययोजना ,औषध फवारणी करूनही अळी नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून ताटात वाढलेला घास हिरावला जातो कि काय अशी चिंता शेतकरी वर्गाला सतावत आहे.अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करावी याबाबत बागलाण तालुका कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करीत आहे.

मका लागवडीनंतर नंतर आठच दिवसात मका पिवळी पडू लागली .या मका पिकावर मोठया प्रमाणावर लष्करी अळीने थैमान घातले आहे.अळी नियंत्रणासाठी सुमारे आठ हजार रुपये खर्च करून दोन वेळेस औषध फवारणी केली मात्र अळी नियंत्रणात येत नाही.

anews Banner

Leave A Comment