*दलेवाडीवस्ती येथे बिपट्या च्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
युवा मराठा न्युज प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ
खालप (ता.देवळा) येथील दलेवाडी वस्तीतल्या सुर्यवंशी यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला केल्याने दोन शेळ्या जागीच ठार झाल्या, गेल्या एक, दोन दिवसा पासून या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली असून त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.
लोहोणेर वासोळ रस्त्याजवळील दलेवाडीवस्तीत लोटन भागा सुर्यवंशी यांच्या घराशेजारील गोठ्यात बुधवार मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला . गोठ्यातील दोन शेळ्या ठार झाल्याचे सुर्यवंशी यांच्या सकाळी लक्षात आल्या नंतर त्यांनी वन विभागाला भ्रमण ध्वनी वरुन कळविले होते. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी जात पंचनामा केला . दरम्यान , देवळा तालुक्यातील खालप येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दलेवाडीवस्ती येथील ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे .
माझे आर्थिक नुकसान झाले असून वनविभागाने मला त्वरित आर्थिक मदत करुन सहकार्य करावे तसेच परिसरात पिंजरा लावून बिपट्या जेरबंद करावा आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होणार नाही यांची काळजी वनविभागाने घ्यावी.
*लोटण भागा सुर्यवंशी शेतकरी*
