Home Breaking News 🚊🚊🚊🚊**आता मुंबईत🚊🚊🚊🚊 लोकल मध्ये या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा...

🚊🚊🚊🚊**आता मुंबईत🚊🚊🚊🚊 लोकल मध्ये या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

107
0

🚊🚊🚊🚊**आता मुंबईत🚊🚊🚊🚊 लोकल मध्ये या कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
मुंबई लोकल ट्रेन् मधून केंद्रीय व राज्य सरकारचे कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसंच राष्ट्रीयकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कर्मचारी, राज भवन कर्मचारी यांचाही यामध्ये समावेश आहे. अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनीही लोकलने प्रवास करता येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ही मुभा १ जुलै म्हणजेच बुधवारपासून देण्यात आली आहे. एवढंच नाही तर बुधवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढही करण्यात आली आहे असंही पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच संरक्षण विभाग, आयकर विभाग, जीएसटी, कस्टम, पोस्ट खात्यातील कर्मचारीही लोकलमधून प्रवास करु शकतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आता मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर एकूण ३५० लोकल फेऱ्या होतील. तर पश्चिम रेल्वेवरही ३५० फेऱ्या होणार आहेत. आता एकूण ७०० लोकल मुंबई धावणार आहेत .राज्य सरकारने निश्चिात केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकलमधून प्रवास करु शकतील. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या मंत्रालय, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय व खासगी रुग्णालय कर्मचारी यांनाच लोकल प्रवासाची मुभा होती. त्यात आणखी काही प्रवाशांची भर पडली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here