• Home
  • पांडुरंगाच्या ६५ फुटी महाकाय मूर्तीचं लोकार्पण 🛑 ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पांडुरंगाच्या ६५ फुटी महाकाय मूर्तीचं लोकार्पण 🛑 ✍️ पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पांडुरंगाच्या ६५ फुटी महाकाय मूर्तीचं लोकार्पण 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕आषाढी एकादशीचा सुवर्णयोग साधत दिवे घाटात श्री विजय कोल्हापुरे यांच्या संकल्पनेतून व मूर्तिकार सागर भावसार यांनी साकारलेल्या ६५ फुटी पांडुरंगाच्या महाकाय मूर्तीचं लोकार्पण माझ्या, अभिनेते-दिग्दर्शक प्रविण तरडे आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पुण्याचा प्रथम नागरिक या नात्याने समस्त पुणेकरांच्या वतीने पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवत माझ्या पुण्याला समृद्धी दे, ही आर्त हाक दिली. मी, माझा पुणेकर, तुझी वारी अशीच खांद्यावर घेऊन चालत राहू.

शतकानुशतके वारकऱ्यांच्या पावलाने आणि विठूनामाच्या गजराने दिवे घाट बहरून असायचा. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पायी वारीला खंड पडला, पण पादुका आळंदी आणि देहूवरुन पंढरपुरला पांडुरंगाच्या भेटीला गेले याचे समाधान आहे. असा मोकळा दिवे घाट पुन्हा पहायला नको, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना !

या प्रसंगी विनोद सातव,रमेश परदेशी,देवेंद्र गायकवाड, अभिजीत भोसले व गणेश लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते…⭕
anews Banner

Leave A Comment