🛑 घरबसल्या ऑनलाईन बनवा रेशन कार्ड 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 03 जुलै : ⭕ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी नोव्हेंबरपर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ८० कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत रेशन देण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो हरभरा देण्यात येईल. यासाठी ९० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. दरम्यान हे मोफत रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड असणे बंधकारक आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड बनवू शकता. सध्या वन नेशन वन रेशन कार्डद्वारे देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात रेशन घेऊ शकता. त्यामुळे आपण ऑनलाईन रेशन कार्ड कसे मिळवता येईल हे पाहणार आहोत.
रेशनकार्डसाठी भारतीय नागरिक तसेच १८ वर्ष पूर्ण होणे अनिवार्य आहे. १८ पेक्षा कमी वय असेल तर तुमचे नाव आई-वडिलांच्या रेशन कार्डमध्ये नोंद केले जाईल. त्या व्यक्तीकडे इतर कोणत्याही राज्याचे रेशन कार्ड असले नाही पाहिजे. शिवाय यापूर्वी कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या रेशन कार्डमध्ये नाव असू नये. तसेच एका कुटुंबाचे रेशन कार्ड कुटुंबातील प्रमुख सदस्यांच्या नावावर असते आणि ज्याचे नाव प्रमुख म्हणून रेशनकार्डवर जोडले गेले आहे, त्या प्रमुखांशी नोंद करणाऱ्या व्यक्तीचे घनिष्ठ संबंध असणे आवश्यक आहे.
रेशन कार्डसाठी कोणत्या साईवर अर्ज करू शकता रेशन कार्ड बनवण्यासाठी कोणतीही केंद्रीय वेबसाईट नाही आहे. तुम्हाला राज्यात फूड पोर्टलवर जाऊन रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. जर तुम्ही उत्तर प्रदेशचे असाल तर तुम्हाला https://fcs.up.gov.in/FoodPortal.aspx या वेबसाईटवर जाऊन अर्जासाठी फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. येथे तीन प्रकारे स्थलांतरित मजूर, ग्रामीण आणि शहरी भागासाठी रेशन कार्ड फॉर्म उपलब्ध आहेत. हा फॉर्म डाऊनलोड करून तुम्हाला सर्व माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही महाराष्ट्रातले असला तर तुम्ही http://mahafood.gov.in/website/english/Download.aspx या वेबसाईटवर जाऊ अर्ज करू शकता.
ऑनलाईन अर्ज फॉर्म भरल्यानंतर काही पैसे घेतले जातील. फॉर्म सबमिट केल्यानंतर तो पडताळणीसाठी पाठविला जातो. हे कामा ३० दिवसांच्या आत केले जाते. जर तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव रेशन कार्डमध्ये नसेल किंवा नोंद करायचे असेल तर तुम्ही फूड पोर्टलवर जाऊन करू शकता. पोर्टलवर जाऊन लॉगिंन केल्यानंतर नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी एक पर्याय दिला जातो. त्यावर क्लिक केल्यावर एक फॉर्म येईल त्यामध्ये बरीच माहिती विचारली जाते. तसेच सर्व कागदपत्रे अपलोड करून हा फॉर्म सबमिट केला जातो. फॉर्म सबमिट केल्यानंतर नोंदणी क्रमांक तयार केला जातो. या क्रमांकाद्वारे तुम्ही फॉर्मचा सतत तपास करू शकता. या फॉर्ममध्ये सर्व काही अचूक असेल तर तो फॉर्म स्वीकारला जाईल आणि रेशन कार्ड पोस्टच्या माध्यमातून तुमच्या घरी पोहोचवले जाईल. राज्यातील फूट पोर्टलवरील वेबसाईटवरून रेशन कार्डसंदर्भातील सर्व गोष्टी तुम्हाला मिळले.⭕