Home रत्नागिरी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर, रक्तगट तपासणी आणि एच...

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर, रक्तगट तपासणी आणि एच बी (Hb) तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0008.jpg

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर, रक्तगट तपासणी आणि एच बी (Hb) तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

रत्नागिरी दिनांक – १४ जुर्ले २०२२ पंचक्रोशी महामंडळ जाकादेवी परिसर (मुंबई) संचलित, स्व.आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये (मांजरे तिठा) येथे छावा प्रतिष्ठान रत्नागिरी, नंदादीप आय हॉस्पिटल आणि जेष्ठ शिक्षक स्व. प्रकाश कि. मुठाळ यांच्या स्मरणार्थ सर्व शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी, रक्तगट तपासणी, एच बी (Hb) तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

दिप प्रज्वलन करून या शिबिराची सुरुवात झाली असून त्यानंतर छावा प्रतिष्ठान रत्नागिरी च्या पदाधिकारी व सदस्य यांच्याकडून मंच्यावरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यालयच्या सर्व शिक्षक वृंद यांसकडून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे अध्यक्ष सुनिल अ. धावडे यांचा सर्व पदाधिकारी व सदस्य समवेत शॉल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भानुदास व्ही देशमुख, जेष्ठ शिक्षक श्री.कमलाकर धो. हेदवकर, श्री.शिशिकांत रा. कांबळे, ग्रुप ग्रामपंचायत बोन्डे – नारशिंगे चे उप सरपंच श्री. महेश स. देसाई यांनी आपली मनोगत व्यक्त केली. व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी च्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे आभार मानले.

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ने या प्रकारची शिबिरे आयोजित करून एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला असून या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.यामध्ये एकूण ११३ विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभाग घेतला.

या शिबिरा प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भानुदास व्ही देशमुख, जेष्ठ शिक्षक श्री. कमलाकर धो. हेदवकर,श्री. शिशिकांत रा. कांबळे, सौ. स्वाती शं. केदार, श्री. सोमनाथ मी. जगताप, श्री. आशिष श. सावंत, श्री. महेश स. देसाई, नंदादीप आय हॉस्पिटल चे प्रतिनिधी श्री. अक्षय विलणकर, श्री. ओंकार शिंदे, श्री. मृण्मय चक्रवर्ती, आरोग्य विभागाकडून सुचिता सूर्यवंशी, प्रियांका रावणंग, स्वाती इंदुलकर, दामिनी रायकर, मनाली कांबळे,म्हसकर हॉस्पिटल रत्नागिरी कडून सौ. समिधा स. धावडे, छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे अध्यक्ष श्री. सुनिल अ. धावडे, सचिव श्री. समीर श्री. गोताड, संघटक श्री. समीर अ.धावडे, सदस्य श्री. चंद्रकांत ग. गोताड, श्री. सचिन अ. धावडे, प्रकाश रा. गोताड, संदेश चं. धावडे इ मान्यवर उपस्थित होते.

छावा प्रतिष्ठान कडून ६ वे शिबीर आयोजित केले गेले, त्यामुळे छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व जिल्हा स्तरावरून व विशेष पंचक्रोशी महामंडळ जाकादेवी परिसर (मुंबई) संचलित, स्व.आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये (मांजरे तिठा) सर्व शिक्षक वृंद यांसकडून कौतुक होत आहे.

Previous articleसंग्रामपूर गटविकास अधिकारी व चार ग्रामसेवक यांची रंगली कार्यालयीन वेळेतच ओली पार्टी
Next articleसरकारमान्यता प्राप्त ग्रामीण रुग्णालयामध्ये रूग्णांचे हाल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here