Home बुलढाणा सरकारमान्यता प्राप्त ग्रामीण रुग्णालयामध्ये रूग्णांचे हाल

सरकारमान्यता प्राप्त ग्रामीण रुग्णालयामध्ये रूग्णांचे हाल

49
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220715-WA0009.jpg

सरकारमान्यता प्राप्त ग्रामीण रुग्णालयामध्ये रूग्णांचे हाल

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल शहर प्रतिनिधी रवि शिरस्कार

ग्रामीण रुग्णालय म्हणजे सामुदायिक आरोग्य केंद्र असते
ही रुग्णालये सरकार चालवत असते. इथे गोर गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळत असतो
प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात 30 खाटा,चार तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी असतात.
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांना हे ग्रामीण रुग्णालय मदत करत असते. सर्व ठिकाणांचे सर्व रुग्ण ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे येत असतात

स्वर्गीय वसंतराव जि पाटील वरवट बकाल यांच्या दान सहकार्यातुन उभारलेले,मध्यवर्ती केंद्र बिंदु समजल्या जाणारे तसेच असंख्य खेडे-पाडे लागुन असलेले ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल.
काही दिवसांपासून या रुग्णालयांमध्ये वरिष्ठ कर्मचारी फक्त हजेरी मांडण्याकरिता येत असतात डॉक्टर्स,नर्सेस हजर असतात परंतु उपचारानंतर औषधी देण्याकरिता बऱ्याच वेळेस फार्मासिस्ट हजर नसतात म्हणुन नाईलाजाने येथील वॉर्डबॉय लोकांना मेडिसिन वाटपकरीत असतात मेडिसिन चा तुटवडा हा दरवेळेसच असतो रुग्णांना पूर्ण डोस कधीही मिळतच नाही काही दिवसांपूर्वी मेडिसिन वाटप करणारे वाघ मॅडम सुट्टीवर असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी दुसरा स्टाफ उपलब्ध असायाला हवा होता मात्र मागील एका महिन्यापासून रुग्णांना खूप प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे तरीही या ग्रामीणरुग्णालयांमधील वरिष्ठ अधिकारी या बाबी कडे दुर्लक्ष करतात, रक्त चाचण्यांसाठी रुग्णांना पायपीट करावी लागते. आर्थिक मजबुरीने गोरगरीब रुग्ण सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयामध्ये खेड्यापाड्या वरून येतात परंतु रुग्णांना योग्य तो उपचार मिळत नाही तरीही वरिष्ठ अधिकारी या बाबींकडे लक्ष देतील का?? असा प्रश्न अनेक रुग्णांकडून होत आहे.

त्याचप्रमाणे या ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये भरपूर प्रमाणात घाण पडुन आहे, सफाई कामगार नियमितप्रमाणे सफाई करीत नाहीत ज्यांच्या नावाने सफाई कामगारांचा पगार निघतो त्यांच्या ऐवजी दुसरेच टेम्परवारी मजूर थातुरमातुर सफाई करून निघून जातात या ग्रामीण रुग्णालयांमध्ये तीन सफाई कामगार मान्य असल्यावरही ,ही परिस्थिती निर्माण झालेली आहे,

पावसाळ्याच्या दिवसांत बालरुग्ण, शाळकरी मुले, अंगणवाडीची मुले यांच्यामध्ये आजारांचे प्रमाण वाढत आहेत,
१ते १० वयोगटाच्या मुलांना सर्दी, ताप,खोकला,जुलाब या सर्व आजारांवर उपचाराकरिता सध्या औषधी उपलब्ध नाहीत,
RBSK अंतर्गत २ औषध निर्माण अधिकारी ची पदे मागील ४ वर्षांपासून रिक्त आहेत तसेच RBSK वैद्यकीय अधिकारी २महिला व १पुरुष हा पदभार सुद्धा मागील ४वर्षांपासून रिक्त आहेत मात्र ती पदे भरण्याची प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांच्याकडून कासव गतीत सुरू आहे, तसेच या रुग्णालयात शवविच्छेदना-साठी सेवक नियुक्त नसल्याने शवविच्छेदनाचा अनुभव असलेले गावामधील तीन-चार युवक नेहमी शवविच्छेदन करण्याकरिता मद्यपान करून पैशांकरिता वाद करत असतात अनेकदा रूग्णांच्या नातेवाईकांकडून, पोलिस कर्मचार्यांकडून, किंवा हजर असलेल्या डॉक्टरांकडून पैशाची मागणी करत असतात.
वरील सर्व समस्यांची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर बऱ्याच वेळा गेलेल्या आहेत तरीही मात्र ते या ग्रामीण रूग्णालय वरवट बकाल समस्यांवर दुर्लक्ष का करीत आहेत??
रुग्णांकडून असा सवाल होत असुन रुग्णालयात असलेल्या अडचणीची त्याचप्रमाणे स्वच्छतेची,पुर्तता त्वरित करण्यात यावी अशी स्थानिक गावकरी मंडळींची मागणी आहे.

Previous articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर, रक्तगट तपासणी आणि एच बी (Hb) तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
Next articleलखमापूर जवळील पूलातील गाळ काढून रस्ता वाहतुकीसाठी केला मोकळा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here