Home बुलढाणा भक्ती महामार्ग कृती समिती सदस्यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची...

भक्ती महामार्ग कृती समिती सदस्यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट

151

आशाताई बच्छाव

1000287832.jpg

भक्ती महामार्ग कृती समिती सदस्यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट चिखली युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर चिखली दौऱ्यावर आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब “सिंदखेडराजा ते शेगाव हो घातलेला भक्ती महामार्ग हा बुलढाणा जिल्ह्यातील 47 गावातील हजारो एकर शेती घेऊन बनणार भक्ती महामार्ग आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी हे भूमिहीन होणार आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील 47 गावातील शेतकऱ्यांनी या भक्तिमार्गाला विरोध केला आहे या भागातुन शेगाव जाण्यासाठी तिन ते चार रस्ते असताना या महामार्गाची गरज नसताना सुद्धा भक्ती मार्ग होऊ घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची बागायती शेती या रस्त्यामध्ये अधिग्रहीत होणार आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे यापूर्वी सुद्धा प्रत्येक तहसील कार्यालय मधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील आमदार यांनी सुद्धा शेतकऱ्याला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना पत्र पाठवून सदर रस्ता रद्द करण्यात यावा म्हणून पत्र पाठवले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज बुलढाणा येथे आले असता भक्तिमार्ग कृती समितीचे सदस्य नितीन म्हस्के समाधान मस्के मधुकर सपकाळ माधव तोरमाळ विश्वंभर जाधव बंडु जाधव निलेश जाधव इत्यादी शेतकरी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना सिनखेडराजाचे आमदार माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच प्रतापराव जाधव यांच्या समवेत भक्ती महामार्ग कृती समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना निवेदन दिले आहे”

Previous articleस्वतःच्या तीन लेकरांना विहिरीत टाकून त्यांचे जीव घेणाऱ्या निर्दयी आरोपी बापास केले जेरबंद.
Next articleदेगलुर शहारामधे सार्वजनिक भीम जयंती उत्साहात साजरी..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.