Home नांदेड “ग्रामीण रुग्णालय कंधार येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा व राष्ट्रीय जंतनाशक...

“ग्रामीण रुग्णालय कंधार येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा व राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीमेस सुरुवात”

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20221012-WA0083.jpg

“ग्रामीण रुग्णालय कंधार येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा व राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीमेस सुरुवात”
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग,नांदेड जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक:-10/10/22 रोजी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटक:-डॉ.दिनकर जायभाये ( समन्वय समिती सदस्य ग्रामीण रुग्णालय कंधार ) यांच्या शुभहस्ते फित कापून मोठ्या थाटामाटात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.डॉ. दिनकर जायभाये यांच्या पुष्पहार घालून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पोकले सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कंधार तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.गुडमेवार सर यांचे स्वागत डॉ.अरूणकुमार राठोड यांनी केले.जंतनाशक हे मोहीम दिनांक:- 10 ऑक्टोबर 2022 ते 15 आक्टोबर 2022 पर्यंत चालनार आहे.सर्व 1 ते 19 वर्षाच्या मुला मुलींना जवळच्या अंगणवाडी /शाळेत जंतनाशकाची सुरक्षित आणि प्रभावी गोळी निशुल्क मिळेल.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ.संतोष पदमवार यांनी केले.
डॉ.दिनकर जायभाये यांनी आपल्या वाणीतून जंताचा प्रादुर्भाव हा अस्वच्छता व मलीनता याचा परिणाम आहे दूषित मातीच्या संपर्कात असल्यामुळे जंताचा प्रसार होतो शोच्यामध्ये जंताची अंडी आहेत अशी संसर्ग झालेली व्यक्ती उघड्यावर स्वच्छालय बसते या अंड्याची मातीत वाढ होते ही अंडी अण्णातून वा अस्वच्छ हातामुळे येतो हातात अथवा जंताच्या अळ्या त्वचेतून शरीरात गेल्याने आणि व्यक्तींना संसर्ग होतो संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अंडी व आल्याची वाढ होऊन जंत तयार होतात जे नंतर परत अंडी घालतात असे मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. गुडमेवार .डी .एल. सर यांनी हात स्वच्छ धुवावेत विशेषता जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर शौचालयाचा वापर करावा पायात चपला बूट घालावे निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावे व्यवस्थित शिजवले अन्न खावे निर्जंतुक व स्वच्छ पाण्याचा भाज्या व फळे धुवावीत नक्की नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत जंत संसर्गावर कोणता उपचार करावा जंतनाशक गोळी अलबेंडाझोल गोळी 400 मिलीग्राम विनामूल्य ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत .
वयानुसार डोस जंतनाशक गोळ्या 1 ते 2 वर्षे अर्धी गोळी 200 मिलीग्राम 2 ते 19 वर्षे पूर्ण गोळी 400 मिलीग्राम जंतनाशक गोळी घ्यावी असे मोलाचे मार्गदर्शन जंतसंसर्ग कसा थांबवा याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ.शाहीन बेगम (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महिला वैद्यकीय अधिकारी) जंतनाशक औषध घेण्याचे फायदे रक्ताचे कमी होतो व आरोग्य सुधारते बालकाची वाढ भराभर होते व ती निरोगी बनतात असे सांगून मार्गदर्शन यांनी केले.
कंधार शहरातील शाळा व अंगणवाडीसाठी एकूण 15 टिम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे सर्व शाळेतील विध्यार्थ्यांना ही गोळी घ्यावे जने करून त्यांचे आरोग्य चांगले राहील असे आव्हान केले आहे .
“आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित…
वैद्यकीय अधिक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांनी आपल्या निरोपातुन बोलताना सांगितले की आज जागतिक चिंतेचा विषय म्हणजे वाढत चाललेले मानसिक अरोग्य. दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या अडचणी, ताणतणाव, नैराश्‍य यामुळे मानसिक आजार झपाट्याने वाढत आहेत. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. त्यानिमित्त “सर्वांसाठी मानसिक आरोग्य आणि कल्याण हे जागतिक प्राधान्य बनवा’ हे या वर्षासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्‍य आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी 10 ऑक्‍टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. वर्ष 1992 मध्ये प्रथम उपमहासचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकाराने व वर्ल्ड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. या संस्थेचे 150 पेक्षा जास्त देशांमध्ये सदस्य असून या दिवशी, मानसिक आजार आणि मानवाच्या जीवनावर होणारे परिणाम याकडे लक्ष वेधण्यासाठी हा वार्षिक जागरूकता कार्यक्रम साजरा केला जातो. “आरोग्य म्हणजे केवळ आजार व दुर्बलता यांचा अभाव नव्हे, तर त्या जोडीने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची परिपूर्ण स्थिती असणे होय’, अशी व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केली आहे.
आज मानवाला सर्व भौतिक सुखे प्राप्त होत आहेत. जग जणू प्रकाशाच्या वेगाने जात आहे. या प्रचंड वेगात शरीराच्या पायभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. जबाबदारी आणि सर्व क्षेत्रातील स्पर्धा यामुळे प्रचंड मानसिक थकवा येतो. पण पुढे जाण्याच्या शर्यतीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आपले शरीर सुदृढ ठेवत असताना मनाचीही काळजी घेणे आवश्‍यक आहे. तुमचे शरीर कितीही कार्यक्षम असू दे, तुमच्याकडे भरपूर कल्पनाशक्‍ती आहे, तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, पण मनाची साथ नसेल तर काही साध्य होत नाही. घरातील एका माणसाचे मानसिक स्वाथ्य बिघडले तर सर्व कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडते. “शहाण्यांचे व्हावे चाकर पण मूर्खाचे होऊ नये धनी’ अशी एक म्हण मराठीमध्ये रूढ आहे. मन आणि शरीर दोनही गोष्टी परस्पर पूरक असून मनुष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. मानसिक विकार हा बरेचदा आनुवंशिकतेने असतो, पण यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. हा विकार जन्मतः असल्यास गर्भावस्थेतील अपुऱ्या वाढीमुळेही होतो. यासाठी गर्भवती महिलेचे आरोग्य आनंददायी असणे गरजेचे आहे.
सुखसोई वाढल्या, उत्पन्न वाढले, गरजही वाढतच चालल्या आहेत, यामधे शरीर आणि मानसिक ओढाताणही वाढत चालली आहे. एखाद्या कुटुंबास “देता किती घेशील दोन कराने’ अशी चंगळ आहे. त्यातून चंगळवाद फोफावत आहे. त्याचवेळी दुसरीकडे “बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था आहे. ही विषमताही स्वाथ्य बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे. सध्या तरुण वर्गाची अवस्थाही बिकट आहे. बुद्धिवंताला साजेसे काम मिळण्याची चिंता, तर कष्टकऱ्याला हाताला काम मिळण्याची चिंता.अशा वेळेला दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणाऱ्याला असूया निर्माण होते, तसेच सुखात लोळणाऱ्याला दुसऱ्याबद्दल तुच्छता वाटते. घरातील करता पुरुष किंवा स्त्री जेव्हा कामासाठी बाहेर पडते तेव्हा घरातील वृद्ध व बालगोपाळ त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली असतास. धनी घरात सुखरूप येईल ना? त्याला येताना गाडी मिळेल का? अशा अनेक प्रश्‍नांनी मन चिंतेनेच व्याकुळ होत असते. सध्या चित्रपटातून दाखविले जाणारे दृश्‍ये पाहून तरुणांचे मनात नको ती आकर्षणे, नको तेव्हा निर्माण होतात. सध्या मोबाइल हा एक मानसिक अवस्थेचा शत्रू प्रत्येकाच्या हातात असतो. पालकांनी आपली मुले काय बघतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.यावेळी बोलताना सांगितले.
तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पोकले बोलताना मानहाले की मानसचिकित्सा क्षेत्रातील व्याख्येनुसार, मानसिक विकारांचा मानसशास्त्रीय पद्धतीने उपचार केला जातो. ज्येष्ठ व अनुभवी उपचारतज्ज्ञाची मानसोपचारपद्धत अभ्यासपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण असते. दिवसेंदिवस वाढणाऱ्या आत्महत्या या ताणतणावातून, नैराश्‍यातूनच होतात.या गोष्टीला जीवघेणी स्पर्धा कारणीभूत ठरते. अनेक विद्यार्थी परीक्षेत गुणवत्ता न मिळणे, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळणे यामुळे वैफल्यग्रस्त होतात. याची जबाबदारी थोडीफार पालकांकडे जाते. मुलांवर अपेक्षांचे ओझे लादले जाते. दोन भावंडामधे डावेउजवे करू नये, त्यांच्या गुणवत्तेबद्दल त्यांच्यासमोर चर्चा करणेही घातक ठरू शकते. नोकरी करणाऱ्या दांपत्यामध्ये बरेचदा गैरसमज निर्माण होतात व त्यामुळेही दोघांचेही मनस्वाथ्य बिघडते तसेच वाद होऊन परिस्थिती हाताबाहेर जाते. त्याची परिणिती घटस्फोटात होते. पण अशा प्रकरणात जर संतती असेल तर त्यांचे हाल होतात, प्रसंगी मुलांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडू शकते. नियमित व्यायाम, योगा यांचा उपयोग शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास चांगला होऊ शकतो.यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले डॉ. संतोष पदमवार(दंतशल्य चिकित्सक) डॉ. नम्रता ढोणे ,(रा बा स्वा का महिला वैद्यकीय अधिकारी),
डॉ. मोरे एस. एस.,डॉ. अरुणकुमार राठोड, डॉ. गजानन पवार (रा बा स्वा का वैद्यकीय अधिकारी) या कार्यक्रमाचे
आभार प्रदर्शन डॉ. संतोष पदमवार यांनी केले.यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleनिमगांवात जीवंत असलेल्या आईला मयत दाखविले,हरामी मुलांनी संपतीसाठी कारस्थान रचले..!!
Next articleसंग्रामपूर तालुक्यात मिळाले चार गावांसाठी चार शिक्षक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here