Home गडचिरोली स्वातंत्र्यालां ७५ वर्ष होऊनही शेतकऱ्यांच्या शेतीचे खातेफोड न होणे ही दुःखद बाब...

स्वातंत्र्यालां ७५ वर्ष होऊनही शेतकऱ्यांच्या शेतीचे खातेफोड न होणे ही दुःखद बाब आमदार डॉ देवरावजी होळी

61
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220518-WA0011.jpg

स्वातंत्र्यालां ७५ वर्ष होऊनही शेतकऱ्यांच्या शेतीचे खातेफोड न होणे ही दुःखद बाब

आमदार डॉ देवरावजी होळी

आमदार देवरावजी होळी यांच्या उपस्थितीत अमिर्झा येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

शेतकऱ्यांच्या शेतीचे खातेफोड करणारा अत्यंत सुलभ कायदा भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात राज्य शासनाने केलेला आहे. मात्र अजून पर्यंत या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे दिसून येत असून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे खातेफोड करण्यात आलेले नाही ही अत्यंत दुःखद बाब असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव जी होळी यांनी अमिर्झा येथील महाराजस्व अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले

यावेळी तहसिलदार महेंद्र गणवीर, कृषी विभागाचे अधिकारी वहाने ,भाजपा तालुका अध्यक्ष रामरतनजी गोहने, अमीर्झाच्या सरपंच सोनालीताई नागापूरे, माजी पंचायत समिती सदस्य शंकरजी नैताम, यांच्यासह विविध मान्यवर मंचावर उपस्थित होते

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जनतेकरिता अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. वर्ग २ची जमीन वर्ग१ करणे ,शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपसी वाटणी पत्र करून घेणे, शेतकऱ्यांची खातेफोड करणे ,यासह महसूल विभागातील विविध योजनांचा सहभाग आहे परंतु राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या उदासीन नेतृत्वामुळे तसेच स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भावनेमुळे अजून पर्यंत या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे किमान आतातरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीचे खाते फोड करून त्यांना योग्य प्रकारे न्याय द्यावा व खातेफोड करण्यासाठी मोहीम राबवून शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी या राजस्व अभियानाच्या प्रसंगी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here