• Home
  • सोयगांव मार्कटमध्ये टाकलेल्या छाप्यात १३ लाखाचा गुटखा जप्त*

सोयगांव मार्कटमध्ये टाकलेल्या छाप्यात १३ लाखाचा गुटखा जप्त*

  • *सोयगांव मार्कटमध्ये टाकलेल्या छाप्यात १३ लाखाचा गुटखा जप्त*
  • मालेगांव,(प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-कोरोना संसर्गजन्य व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे आणि मालेगाव शहर कोरोनाचा हाँटस्पाँट ठरलेला असतानाही मालेगांव शहरातल्या सोयगांव मार्कटमध्ये आज जिल्हाधिकारी नाशिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर टाकण्यात आलेल्या छाप्यात सुमारे १३ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याने सोयगाव मार्कटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
    याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,सोयगांव मार्कटमधील एस.मोहनलाल अँन्ड ब्रदर्स या दुकानातून कँम्प पोलिस स्टेशन व गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे २३३ गोण्या गाय छाप तंबाखुजन्य पदार्थाचा साठा सुमारे किंमत १३ लाख ४३२रुपयांचा मुद्देमाल परवाना नसताना बाळगल्याप्रकरणी कँम्प पोलिस स्टेशनला संजय मोहनलाल छाजेड विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांचेसह कँम्प पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी चव्हाण,संदीप दनगुडे आदीनी सहभाग घेतला.*हेदेखील वाचा👉🏼मालेगांव शहर व परिसरात गुटखा,तंबाखू आणि किराणा मालातही अव्वाच्या साव्वा भावाने लुटमार सुरु आहे.तर गायछाप तंबाखू सर्रासपणे ७० रुपये किमतीला विक्री होत असतानाही या प्रकाराकडे सप्लाय विभागाचे पुर्णत दुर्लक्ष झाले आहे.*
anews Banner

Leave A Comment