• Home
  • 🛑 राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक, हे आहे महाजॉब्स वेबपोर्टल खास वैशिष्ट्य 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक, हे आहे महाजॉब्स वेबपोर्टल खास वैशिष्ट्य 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक, हे आहे महाजॉब्स वेबपोर्टल खास वैशिष्ट्य 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 जुलै : ⭕ राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची सोहळ्यासाठी उपस्थिती होती. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशानं हे पोर्टल तयार करण्यात आलं. तर सुभाष देसाई यांनी राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक असणार असल्याची घोषणा केली आहे.

खरंतर डोमिसाइल बंधनकारक असल्यामुळे फक्त भूमिपुत्रांनाच संधी मिळणार आहे. याचा फायदा घेत कंपन्यांनी आणि उद्योजकांनी स्थानिकांना नोकरी द्यावी. त्यांच्याकडील कौशल्याचा योग्य उपयोग व्हावा, त्यातून आपल्या विभागाचाही विकास व्हावा असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पोर्टलच्या माध्यमातून 100 टक्के स्थानिकांना नोकरी मिळणार आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. राज्यात सध्या 65 हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे.

मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसंच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. http://mahajobs.maharashtra.gov.in या पोर्टलवर तुम्हाला माहिती भरायची आहे. यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक उपस्थित होते.⭕

anews Banner

Leave A Comment