Home गडचिरोली ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हयात स्वतंत्र वस्तीगृह सुरू करा आमदार डॉ देवरावजी होळी...

ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हयात स्वतंत्र वस्तीगृह सुरू करा आमदार डॉ देवरावजी होळी यांची बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मागणी

75
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220518-WA0012.jpg

ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हयात स्वतंत्र वस्तीगृह सुरू करा

आमदार डॉ देवरावजी होळी यांची बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मागणी

जिल्हा केंद्रावर २ तर समाज बहुल तालुक्यात किमान १ वसतिगृह सुरू करण्याची मागणी

सर्किट हाऊस गडचिरोली येथे भेट घेवून पत्राद्वारे केले निवेदन

ओबिसी समाजातील उद्योगप्रेमी तरुणांना अनुसूचित जाती जमाती च्या धर्तीवर १५% मार्जिंग मनी उपलब्ध करून देण्याची केली विनंती

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली जिल्ह्यात केवळ आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागाचे वस्तीगृह असल्याने ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी अत्यल्प जागा उपलब्ध करून दिल्या जातात त्यामूळे अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणे अडचणीचे ठरते त्यामुळे जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हयात स्वतंत्र वस्तीगृह सुरू करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी राज्याचे बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चूजी कडू यांच्याकडे गडचिरोली येथे भेट घेवून केली.

यावेळी आमदार महोदयांनी गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांना स्वतंत्र वस्तीगृह नाही त्यामुळे त्यांच्या अडचणी लक्षात घेण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री महोदयांना अवगत करुन दिले.

त्यासाठी गडचिरोली जिल्हा केंद्रावर २ वस्तीगृह तर चामोर्शी, आरमोरी, वडसा, गडचिरोली, या तालुक्यात किमान १ वसतिगृह सुरू करण्यात यावे अशी मागणी केली
तसेच ओबिसी समाजातील उद्योगप्रेमी तरुणांना अनुसूचित जाती-जमाती च्या धर्तीवर १५% मार्जिंग मनी उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना त्याचा मोठा लाभ होईल त्यामूळे १५% मार्जिंग मनी उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी यावेळी केली

Previous articleस्वातंत्र्यालां ७५ वर्ष होऊनही शेतकऱ्यांच्या शेतीचे खातेफोड न होणे ही दुःखद बाब आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleप्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here