Home नांदेड प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

50
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220522-WA0047.jpg

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड :- आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असंघटीत व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी असून एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर राबविली जात आहे. ही योजना मोहिम स्वरुपात राबविण्यात येत असून अर्ज करण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी दर बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आवश्यक कागदपत्रासह (आधारकार्ड, पॅनकार्ड, वीज बिल, बँक पासबुक, यंत्रसामुग्रीचे कोटेशन, जुना उद्योग असल्यास 2 वर्षापूर्वी स्थापन झालेला असावा व त्याचा पुरावा असावा, इतर परवाने असल्यास ते आणावे) प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय, संतोष बीज भांडारच्यावर, नवीन मोंढा, नांदेड किंवा संबंधित तालुका कृषि कार्यालयात उपस्थित रहावे. इच्छुकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यासाठी हळद व इतर मसाले पदार्थ हे उत्पादन मंजुर आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगाकरिता, सामाईक पायाभुत सुविधा केंद्रासाठी 35 टक्के अनुदान, ब्रॅडींग व मार्केटींगसाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता गटांना बीज भांडवल लहान उपकरणे खरेदीसाठी 40 हजार प्रती सभासद (4 लाख) पर्यंत अनुदान देय राहील. तसेच या योजनेंतर्गत यापुढे वैयक्तिक नवीन अन्नप्रक्रिया उद्योग आणि सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या वैयक्तिक अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी (जसे गुळ उद्योग, दाळ मिल आदी ) एक जिल्हा एक उत्पादनाच्या व्यतिरीक्त इतर प्रस्ताव देखील या योजनेमध्ये सादर करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here