Home बुलढाणा तामगाव पोलीस स्टेशन कडून तालुक्यात प्रत्येक ठिकाणी तगडा”बंदोबस्त…

तामगाव पोलीस स्टेशन कडून तालुक्यात प्रत्येक ठिकाणी तगडा”बंदोबस्त…

148
0

Yuva maratha news

1000317918.jpg

तामगाव पोलीस स्टेशन कडून तालुक्यात प्रत्येक ठिकाणी तगडा”बंदोबस्त…

उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे वाचक सुद्धा उपस्थित.

युवा मराठा न्यूज ब्युरो रिपोर्ट बुलढाणा संग्रामपूर:
बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी दि. 26 एप्रिल 2024 रोजी संग्रामपूर तालुक्यामधील विविध मतदान केंद्रावर मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गवळी यांचे वाचक श्रीकांत विखे पाटील व तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार, पोहेका आखरे,गवांदे,मनीष वानखडे तसेच एस आर पी बटालियन सह या आदिवासीबहुल तालुक्यात नेमलेले पोलीस कर्मचारी हे आपल्या तगड्या बंदोबस्ता मध्ये तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यंत कर्तव्यावर खरे उतरतांना पाहायला मिळाले तालुक्यात सार्वत्रिक निवडणुक मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्व पोलीस अधिकारी तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर कडकडीत उन्हामध्ये कर्तव्यावर तैनात असताना पाहायला मिळाले असून उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचे वाचक श्रीकांत विखे पाटील यांनी नागरिकांना मतदान करणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे आणि ती व्यवस्थित प्रत्येकाने पार पाडावी अशा प्रकारची माहिती व मार्गदर्शन केले तसेच विविध प्रकारे पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा मतदान करणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार माहिती दिली अशाप्रकारे पोलीस विभाग आपली कर्तव्य खूप चांगल्या प्रकारे पार पाडले असल्याचे आज ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या त्यामुळे पोलीस कर्मचारी हा मनुष्यबळाचा एक रक्षक होय म्हणजेच त्यांचे कौतुक करावे लागेल तसेच संग्रामपूर तालुक्यात शांततेने मतदान प्रक्रिया पार पाडली तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी मतदान प्रक्रिया चालू होती आणि आज मोठ्या प्रमाणात लग्नाची तारीख असल्याने काही प्रमाणात मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले असले तरी लोकांमध्ये मतदानाचा खूप चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला फक्त तालुक्यातील कोद्री या ठिकाणी मतदान बुथवर काही प्रमाणात नागरिकांची पिण्याच्या पाण्याअभावी गैरसोय होण्याचे कारण संबंधित विभागाकडून खर्च मिळत नसल्याने स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो अशी नाराजी सुद्धा कर्मचाऱ्यांपैकी एकाने मतदारावराने पाणी मागितल्याने नागरिकांवर चिडून आपल्या भावना स्पष्ट केल्याचे पहावयास मिळाले व मतदान बूथ रूमच्या बाहेर सावलीकरिता मंडप नसल्याने उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागले अशाप्रकारे गैरसोय होतांना दिसून आली असून अपंग व्यक्ती करीता व्हीलचेअर नसल्याचे सुद्धा त्या ठिकाणी समजले परंतु तालुकाभर पोलीस विभागाकडून होत असलेल्या सहकार्याने लोकांमध्ये आनंद सुद्धा दिसून आला.

Previous articleपत्रकारास शिवीगाळ धमकी देणार्‍या शिवाजी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन
Next articleजिंतूर तालुक्यात लोकशाही बळकट करण्यासाठी नवरदेव नवरीचे मतदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here