Home जालना पत्रकारास शिवीगाळ धमकी देणार्‍या शिवाजी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम आदमी...

पत्रकारास शिवीगाळ धमकी देणार्‍या शिवाजी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

23
0

Yuva maratha news

1000317913.jpg

पत्रकारास शिवीगाळ धमकी देणार्‍या शिवाजी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
आम आदमी पक्षाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन
जालना । दिलीप बोंडे ब्युरो चीफ- येथील दैनिक जगमित्रचे संपादक संतोष विष्णु भुतेकर यांना फोनवरुन रावसाहेब दानवे यांच्याबद्दल वृत्तपत्रात बातम्या का छापतो म्हणत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या शिवाजी जगन्नाथ गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक  जगमित्र चे संपादक संतोष भुतेकर रा. हिवर्डी ह.मु. जालना यांना गुरुवार दि. 25/04/2024 रोजी शिवाजी जगन्नाथ गायकवाड या माणसाने फोन वर रावसाहेब दानवेबद्दल वृत्तपत्रात लिहतो म्हणत शिवराळ शिवीगाळ केली व तुझ्या घरी येऊन तुला पाहतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. पत्रकाराला धमकी देणार्‍या शिवाजी जगन्नाथ गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करून संबंधीत पत्रकाराला व त्याच्या परिवाराला पोलीस सरंक्षण देण्यात यावे, नसता लोकशाही मार्गाने आचार संहितेचे पालन करून आम आदमी पक्षाच्या जालना तालुक्याच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
निवेदनावर आपचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे, आर. आर. पाटोळे, भिमा शिंदे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Previous articleवयाच्या 95 वर्षी आजीबाईने बजावला मतदानाचा अधिकार
Next articleतामगाव पोलीस स्टेशन कडून तालुक्यात प्रत्येक ठिकाणी तगडा”बंदोबस्त…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here