Home मुंबई केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस.. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ बेसिक वेतनात डीए...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस.. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ बेसिक वेतनात डीए आता 31 टक्के वाढीव भत्ता 1 जुलै 2021 पासून लागू …!

75
0

राजेंद्र पाटील राऊत

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस.. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ बेसिक वेतनात डीए आता 31 टक्के वाढीव भत्ता 1 जुलै 2021 पासून लागू …!

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात डीए आता 31 टक्के झाला आहे. वाढीव भत्ता 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आला आहे.

या सवलती 8 नोव्हेंबरपासून संपत आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पूर्णवेळ हजेरी नोंदवावी लागणार आहे. हजेरी नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance) प्रणाली उद्यापासून पूर्ववत करण्यात येत आहे.कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) काळात सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा आता बंद करण्यात येत आहेत.

बायोमेट्रिक हजेरीबाबत सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. भारत सरकारचे उपसचिव उमेश कुमार भाटिया यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि कामाचे तास कमी करणे यासारख्या सवलती आधीच रद्द करण्यात आल्या आहेत. आता 8 नोव्हेंबरपासून प्रत्येक कर्मचाऱ्याला बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे.

केंद्र सरकारने यासाठी संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वानुसार बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवणे आवश्यक असेल. सर्व कर्मचारी हजेरी नोंदवण्यापूर्वी आणि नंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ करतील. बायोमेट्रिक हजेरी नोंदवताना कर्मचाऱ्यांना आपापसात सहा फुटांचे अंतर राखावे लागेल. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकवेळी मास्क घालणे अनिवार्य असणार आहे.

 

बायोमेट्रिक मशीनचे टचपॅड वारंवार स्वच्छ करण्यासाठी नियुक्त कर्मचारी तैनात केले पाहिजेत. हे कर्मचारी हजेरी नोंदवण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वानुसार पालन करण्यासाठी मार्गदर्शनही करतील. बायोमेट्रिक मशीन संदर्भात सूचना देणारे परिपत्रक केंद्र सरकारकडून जारी करण्यात आले आहे. यात बायोमेट्रिक मशीन मोकळ्या वातावरणात ठेवावी. जर मशीन आत असेल तर त्याठिकाणी पुरेसे नैसर्गिक व्हेंटिलेशन असावे, असे म्हटले आहे.

Previous articleएस टी कामगारांचा संप चिघळला, एस टी कामगार कृती समितीचा आज पासून राज्यव्यापी संपाचा इशारा..?
Next articleयंदाची दिवाळी व्यवसायिकांना लाभदायी : आतापर्यंत १.२५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here