Home मुंबई एस टी कामगारांचा संप चिघळला, एस टी कामगार कृती समितीचा आज पासून...

एस टी कामगारांचा संप चिघळला, एस टी कामगार कृती समितीचा आज पासून राज्यव्यापी संपाचा इशारा..?

95
0

राजेंद्र पाटील राऊत

एस टी कामगारांचा संप चिघळला, एस टी कामगार कृती समितीचा आज पासून राज्यव्यापी संपाचा इशारा..?

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे/युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

एस टी कामगारांचा संप चिघळला असून,युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर चे ठाणे सहसंपादक यांनी खोपट आगारातून कामगारांच्या प्रतिक्रिया,आणि आगारातील प्रवासी,बस डेपो परिस्थितीचा आढावा घेतला असता एस टी कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक दिवसांपासून कामगारांचा संप सुरू आहे.परंतु आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोणतेच ठोस पाऊल न उचलता,एस टी कामगारांचा विरोधात एस टी प्रशासन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने सादर याचिकेवर सुनावणी करताना कामगारांनी तात्काळ कामावर रुजू ह्यावे सांगितले दिवाळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात गावी गेलेल्या प्रवाशांना त्रास होणे योग्य नाही,परंतु एस टी कामगार आपल्या मूळ मागणीवर ठाम राहिले आहेत.
कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे ती की एसटीची विलिनीकरण सरकारमध्ये व्हावे”.

या संपावर तोडगा न निघाल्याने राज्य सरकारला सोमवारी भूमिका मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी २५० पैकी ५९ डेपो मध्ये कामगारांनी संप करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे राज्यात दिवाळीच्या तोंडावर अनेक प्रवाशांची गैरसोय झालेली आहे.
तसेच आता हा संप चिघळला असून उद्या सकाळी १०.०० वाजता उच्च न्यायालयाने प्रशासनला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या तरी एस टी कामगारांचा आंदोलना बद्दल उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणी वर संपुर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे.

– एस टी कामगारांचा संप सुरू आहे,मुख्यमंत्र्यांकडून एकादे पत्र सुधा आले नाही, १० नोव्हेंबर ला सर्व एस टी कामगारांनी मंत्रालय प्रांगणात कुटुंबासमवेत जमून आंदोलन करू अशी आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

यापूर्वी २ दिवसाच्या आधी एस टी कामगारांच्या संपा संधर्भात अनिल परब यांनी ”
एसटी कर्मचाऱ्यांची सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसमोर ठेवेन, असं आश्वासन अनिल परब यांनी दिलं होत
तर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं वजन वापरुन ही मागणी पुढे न्यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली होती.

यावेळी माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, “राज्य सरकारने आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी २,७०० कोटी रुपये दिले आहेत.

कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची १७ टक्के मागणी असताना २८ टक्के महागाई भत्ता दिला आहे. तिजोरीवर भार पडत असताना मागण्या मान्य केल्या आहेत. पण तरीही एसटी विलिनीकरण्याचा मुद्दा घेऊन पुन्हा आंदोलन सुरु केलं. याला काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला”.एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीविषयी अनिल परब यांनी आश्वासन दिलं होत. ते म्हणाले, “मी विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवेन. संपात सहभागी असलेल्या एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई केलेली नाही. १५ ते १७ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी आज संध्याकाळपासून कामावर यावं. दिवाळीत जर लोकांना त्रास झाला तर मात्र प्रशासकीय कामकाज म्हणून कारवाई करणं भाग पडेल”.
परंतु आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या या आश्वासनांचा काही उपयोग एस टी कामगारांचा आंदोलनावर होताना दिसत नाही, याचा प्रत्यय ठाणे येथील खोपट बस आगारात आला,दिवाळीच्या तोंडावर अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे,गावी गेलेल्या व महाराष्ट्रात अडकून राहिलेल्या प्रवाश्यांना उद्या सकाळी उच्च न्यायालय एस टी कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन असं अशा कामगारांची आहे.

Previous articleपालघरच्या मच्छिमारांचा ओखा-पाकिस्तान हद्दीत गोळीबारात मृत्यू
Next articleकेंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस.. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ बेसिक वेतनात डीए आता 31 टक्के वाढीव भत्ता 1 जुलै 2021 पासून लागू …!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here