Home माझं गाव माझं गा-हाणं पालघरच्या मच्छिमारांचा ओखा-पाकिस्तान हद्दीत गोळीबारात मृत्यू

पालघरच्या मच्छिमारांचा ओखा-पाकिस्तान हद्दीत गोळीबारात मृत्यू

141
0

राजेंद्र पाटील राऊत

पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                            रविवार दिनांक ०७/११/२०२१ रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील मासेमारी नौकेवर गोळीबार करण्यात आला असून महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील वडरई गावातील एका माच्छिमाराचा गोळीबारात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या गोळीबारात गुजरातच्या एका मच्छिमाराला गोळी लागून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती हाती आली आहे.

या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात तणावाचे वातावरण झाले असून राज्य व केंद्र सरकारने त्वरित मृतदेह आणण्याची व्यवस्था करण्याची मागणी मच्छिमारांकडून होत आहे. तसेच पाकिस्तान सैनिकांच्या अमानवी कृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे.

दिनांक ०६/११/२०२१ रोजी गुजरात राज्याच्या ओखा बंदर येथील मासेमारी नौका “जलपरी” मासेमारी करण्यास समुद्रात निघाली होती. दिनांक ०७/११/२०२१ रोजी ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा येथे मासेमारी करत असताना पाकिस्तानी सागरी सुरक्षा रक्षकांनी भारतीय जलधी क्षेत्रात शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार करण्यात आला ज्यात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील तरुण मच्छिमार श्रीधर रमेश चामरे, वय ३०, यांचा या गोळीबारत दुर्दैवी मृत्यू झाला असून महाराष्ट्र व गुजरात सरकारने त्वरित पाऊले उचलून केंद्र सरकारच्या सह्ययाने श्रीधर रमेश चामरे ह्यांचा मृत्यदेह सन्मानपूर्वक आणण्याची विंनती मच्छिमारांनी केली आहे.

ओखा येथील मरीन पोलिस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर घटनेची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौकेचे मालक जयन्ताभाई बोखामा ह्यांनी दिली.

Previous articleभाऊबीजेलाच निर्घृण हत्या तीन बहिणीच्या एकुलत्या एक भावाची निघाली अंत्ययात्रा;प्रेमप्रकरण भोवले!
Next articleएस टी कामगारांचा संप चिघळला, एस टी कामगार कृती समितीचा आज पासून राज्यव्यापी संपाचा इशारा..?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here