Home माझं गाव माझं गा-हाणं भाऊबीजेलाच निर्घृण हत्या तीन बहिणीच्या एकुलत्या एक भावाची निघाली अंत्ययात्रा;प्रेमप्रकरण भोवले!

भाऊबीजेलाच निर्घृण हत्या तीन बहिणीच्या एकुलत्या एक भावाची निघाली अंत्ययात्रा;प्रेमप्रकरण भोवले!

390
0

राजेंद्र पाटील राऊत

भाऊबीजेलाच निर्घृण हत्या तीन बहिणीच्या एकुलत्या एक भावाची निघाली अंत्ययात्रा;प्रेमप्रकरण भोवले!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मनमाड-दिवाळीसारख्या महत्वाच्या व आनंदाचे वातावरण निर्माण करणाऱ्या सणालाच नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड रेल्वे स्टेशनवर काल हदयद्रावक व मन हादरवून सोडणारी घटना घडल्याचे समोर आले आहे.
काल ऐन भाऊबीजेच्या दिवशीच एकुलत्या एक भावाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.काल भाऊबीजेच्या दिवशी चांदवड तालुक्यातल्या तिघा बहिणींचा एकुलता एक आणि आईवडीलांचा लाडका मुलगा अशाप्रकाराने मृत्यू पावल्याने चांदवडजवळील उसवाड गावावर शोककळा पसरली आहे.प्रेमिकेच्या डोळ्यादेखत प्रियकराला चाकूने सपासप घाव घालून आरोपी नंदिग्राम एक्सप्रेसने फरार झाले.या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत असून,शिवम संजय पवार रा.उसवाड ता.चांदवड जि.नाशिक असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून,आईवडीलांचा एकुलता एक मुलगा तर तीन बहिणीचा शिवम हा एकटा भाऊ होता.एकटया मुलाचा व भावाचा अशा रितीने निर्घृणरित्या खुन झाल्याने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या हत्येमागचे कारण इंस्टाग्राम या सोशल मिडीयाच्या अँपवर फेक आयडी बनवून अश्शील फोटो टाकल्याचा व प्रेमप्रकरणातून हि हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.पोलिसांकडून याप्रकरणी उपलब्ध झालेल्या माहितीवरुन उल्हासनगर(कल्याण) येथील राहणाऱ्या मनिषा नावाच्या युवतीसोबत इंस्टाग्रामच्या माध्यमातून शिवमची सुमारे दोन अडीच वर्षापूर्वी ओळख झाली होती,या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते.शिवम व मनिषा एकमेकांच्या संपर्कात असताना आपली प्रेमिका तिच्या मित्रांबरोबर फिरते,फोनवर बोलते,व्हाँटसअपवर चँटीग करते याचा राग आल्याने शिवमने मनिषासोबत फोनवरुन कडाक्याचे भांडण काढले.आणि इंस्टाग्राम अँपवर बनावट आयडी बनवून चेतन व मोहित यांचे अश्शील फोटो टाकले.या रागातून चेतनने शिवमला माझ्या नावाचे बनावट आयडी बनवून अश्शील फोटो का टाकलेत अशी विचारणा केल्यावर त्यावर प्रतिउतर म्हणून शिवमने चेतनला फोनवरुनच सांगितले की,तु मनिषाचा नाद सोड ,मनिषासोबत संबंध ठेऊ नकोस,नाही तर अजून बदनामी करेन अशा स्वरुपाची धमकी शिवमने चेतन यास दिल्याने,चेतन याने मनिषाला सांगितले की,तु आमच्याबरोबर कामावर राहतेस म्हणून चेतनने आमची बदनामी केली आहे.तु त्याला इकडे बोलावून घे म्हणून मनिषाला शिवम यास फोन करण्यास चेतन याने सांगितले.मात्र मनिषाने फोन केल्यावर शिवम त्यांना बोलला की,तुम्हीच इकडे मनमाडला या..त्यानुसार शिवमची प्रेमिका व तिचे मित्र चेतन,मोहित,निल,मयुर असे पाच जण दिनांक ५ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता कल्याण रेल्वे स्टेशनवरून मनमाडकडे यायला निघाले.रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास मनिषासोबत आलेल्या या चौघांनी मनमाड रेल्वे स्टेशन गाठले.तेथे अगोदरच शिवम हजर होता.त्याने या सगळ्यांना पार्सल आँफीसकडे चला म्हणून सोबत येण्यास सांगितले तेथे गेल्यावर शिवमने मनिषाला मारहाण करीत भांडण केले.त्याशिवाय मनिषासोबत आलेल्या चौघांसोबतही शिवमने भांडण केले.शिवम रागात व संतापात असल्याचे पाहून हे पाचही जण कल्याण उल्हासनगरला परत जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील फलाट नंं.४ वर उभ्या असलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसजवळ पोहचले आणि गाडीत बसण्यासाठी जात असतानाच पुन्हा शिवम मागून आला व परत त्यांच्यात भांडणे सुरु झाली.कल्याणहून मनिषासोबत आलेले सगळेजण शिवमला फेक आयडी बंद करुन टाक व सर्व वादविवाद मिटव असे सांगत असताना शिवम कुणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यामुळे मोहित व त्याच्या मित्रांनी शिवमला मारहाण करण्यास सुरुवात केली.लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याबरोबरच मयुरने चाकुने भोसकत व घाव घालत तशाच अवस्थेत शिवमला तेथेच सोडून या चौघांही जणांनी धावत्या रेल्वेतून तेथून पळ काढला.तर प्रेमिकेच्या समोरच प्रियकर शिवम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून प्रेमिका मनिषा ने मदतीसाठी आरडाओरड सुरु केला,तेथे काही वेळातच पोलिस आल्याने त्यांनी शिवमला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले,मात्र शिवमवर गंभीर स्वरुपाचे वार केलेले असल्याने त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी मनिषा या तरुणीला ताब्यात घेतले असून,तिच्या तक्रारीवरून मोहीत,चेतन,निल,व मयुर या चार मित्रांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवा मराठा परिवाराचे मुलांच्या पालकांना कळकळीचेआवाहन”
मनमाड येथे घडलेल्या या घटनेवरुन एक मात्र अधोरेखीत झाले की,मोबाईल चांगला तसा आयुष्याचा सत्यानाश करणारा देखील असे म्हटले तर वावगे काहीच ठरणार नाही,त्यामुळेच अलिकडच्या काळात स्मार्टफोन,आयफोन,सारख्या कौतुकासाठी आपण आपल्या मुलांचे नको ते फाजील लाड करायला लागलोत,या मोबाईलच्या मायाजालात गुरफटलेल्या तरुणाईने अक्षरशः इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मिडीयावर धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे.त्यातूनच मग हे असे आत्मघातकी व विनाशकारी कृत्य घडायला लागली आहेत,त्यामुळे आपला मुलगा मोबाईलवर नेमके काय करतो?त्याचे मित्र मैत्रीण कोण?यावर आता काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आईवडीलांची असल्याचे या घटनेवरुन दिसुन येते,आज मोबाईलच्या मायाजालात ९९/ टक्के तरुणाई भरकटत चालली आहे,हाच चिंतेचा व चिंतनाचा गहन प्रश्न असून,युवा मराठा मुलांच्या आईवडीलांना कळकळीचे आवाहन करीत आहे की,अजूनही सांभाळा आपल्या मुलांना एवढेच यानिमिताने!

Previous articleदर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही मालेगाव ते थेट वैष्णवी देवी माता मंदिर (जम्मू-काश्मीर) सायकल यात्रा
Next articleपालघरच्या मच्छिमारांचा ओखा-पाकिस्तान हद्दीत गोळीबारात मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here