• Home
  • 🛑 *पुण्यात ६३९ कोरोनामुक्त; २४१ नवे रुग्ण* 🛑

🛑 *पुण्यात ६३९ कोरोनामुक्त; २४१ नवे रुग्ण* 🛑

🛑 *पुण्यात ६३९ कोरोनामुक्त; २४१ नवे रुग्ण* 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुण्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजारांपर्यंत कमी झाली आहे. मंंगळवारी 241 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 639 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मागील चोवीस तासात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला. या मृतांपैकी 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

काल दिवसभरात स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी केवळ 2 हजार 331 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 241 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 50 हजार 86 वर पोहोचली आहे. शहर परिसरातील विविध रुग्णालयांत 6 हजार 4 रुग्ण उपचार घेत आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 620 रुग्ण अत्यवस्थ आहेत, तर 346 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 274 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

कोरोनामुळे मृत्यूू झालेल्यांची संख्या 4 हजार 163 वर पोहोचली आहे. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 49 हजार 919 झाली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment