• Home
  • नांदेड जिल्ह्यातील लहान तालुका अर्धापूर येथे विद्युत चाक वितरण सोहळा संपन्न.

नांदेड जिल्ह्यातील लहान तालुका अर्धापूर येथे विद्युत चाक वितरण सोहळा संपन्न.

नांदेड जिल्ह्यातील लहान तालुका अर्धापूर येथे विद्युत चाक वितरण सोहळा संपन्न. जाहूर( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-नांदेड जिल्ह्यातील लहान तालुका अर्धापूर येथे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तीकरण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील साठ कुंभार बांधवांना आज इलेक्ट्रिक चाकेप्रदान करण्यात आली. केंद्रीय शिक्षण लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने देशातील कुंभारांनासक्षम बनवण्यासाठी कुंभार सशक्तिकरण योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील साठ कुंभार बांधवांना प्रशिक्षण देण्यात आले आज केंद्रीय सुक्षम लघु मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी साहेब यांच्या हस्ते या कुंभारांना दूर दृश्य प्रणालीद्वारे इलेक्ट्रिक चाके प्रधान करण्यात आली खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष श्री विनय कुमार सक्सेना यावेळी उपस्थित होते देशातील कुंभारांना आर्थिक आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी स्वातंत्र्यानंतर सुरू करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले महाराष्ट्रासह देशाच्या अन्य दुर्गम भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल असे ते म्हणाले त्यांनी यावेळी लाभार्थी कुंभार बांधवा सोबत संवाद साधला या योजनेअंतर्गत देशभरातील कुंभारांना 18000 इलेक्ट्रिक चाके प्रदान करण्यात आली असून त्याचा सुमारे 80 हजार लोकांना लाभ मिळाल्याचे खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमासाठी स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था जिल्हाध्यक्ष श्री विजय रावजी देवडे साहेब सचिन श्री शिवाजीराव पांगरेकर साहेब युवा कोर कमिटी अध्यक्ष श्री बालाजीराव घुमलवाड साहेब जिल्हा संघटक श्री दिगंबरराव मरकंटे सर जिल्हा संघटक श्री बालाजीराव कुंडलवाडी कर साहेब श्रीशंकर कुरणा पलेसर व श्री विजय वादे उंदरी कर युवा तालुकाध्यक्ष नांदेड या कार्यक्रमास उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment